Breking News
मोशी कचरा डेपो दुर्घटना : इमारती भोवतालचा मलबा हटवून इमारतीत सुरक्षित प्रवेश मार्ग तयार करण्याच्या कामाला सुरुवातमोशी इमारत दुर्घटना: प्राथमिक पाहणीनुसार संतृप्त घनकचऱ्याच्या आडव्या दाबामुळे इमारत उलटल्याचा अंदाज‘पुनीत बालन ग्रुप’कडून आषाढी वारीतील पोलिसांना ९ हजार जीवनावश्यक वस्तूंचे किटपुण्यातून पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त मध्यरात्रीनंतर वाहतूकीत बदलपुण्यात डाॅक्टरांकडे ५० हजारांची खंडणीची मागणीविवाहाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कारमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा’ माहितीपटाचा प्रीमियर‘विठू माऊली’ कार्यक्रमातून दुमदुमणार हरिनामाचा गजरपुण्यातील त्या कर्तव्यदक्ष उपनिरीक्षकाचे निलंबन मागेमोशी कचरा डेपो दुर्घटना : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी इमारतीत अडकलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांशी साधला संवाद

अल्पवयीन मुलाकडून वाहनचोरीचे तीन गुन्हे उघड

21

भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

marathinews24.com

पुणे – भारती विद्यापीठ पोलिसांनी वाहन चोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी कारवाई करून अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून वाहन चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आणले आहेत. कारवाईत दोन दुचाकी आणि एक तीनचाकी रिक्षासह एकूण २ लाख ३५ हजार रुपयांची वाहने जप्त करण्यात आली.

गुंड सुरज ठोंबरे टोळीतील सराईत अटकेत, पिस्तूल जप्त – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या वाहनचोरीच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पोलिस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास मोहीम सुरू होती. यावेळी पोलिस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, अंमलदार मितेश चोरमोले, सागर बोरगे आणि अभिनय चौधरी हे वाहन चोरांचा शोध घेत असताना वंडरसिटी परिसरात एकजण मोकळ्या जागेत चोरीची वाहने घेऊन थांबला असल्याची माहिती मिळाली.

पोलिसांनी माहितीच्या आधारे पोलिसांनी वंडरसिटी रस्ता ते सावंत विहार मार्गावर सापळा रचला. तेथे संबंधित मुलाकडे रिक्षा
आणि मोपेड आढळून आली. चौकशीत त्याने साथीदारांच्या मदतीने ही वाहने चोरल्याची कबुली दिली. दोन्ही वाहने तात्काळ जप्त करण्यात आली. पुढील तपासात संबंधित मुलाने आणखी दोन साथीदारांसह एक दुचाकी चोरी केल्याचेही उघड झाले. या माहितीच्या आधारे ती दुचाकीही जप्त करण्यात आली. कारवाईमुळे भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यातील भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अंतर्गत नोंद असलेले तीन वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×