Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

ड्रेनेज लाईनच्या कामात तिघे कामगार खड्डयात पडले

ड्रेनेज लाईनच्या कामात तिघे कामगार खड्डयात पडले

दोघांना वाचविण्यात यश, नांदेडसिटी परिसरातील घटना

marathinews24.com

पुणे – ड्रेनेज लाईनच्या कामात तिघे कामगार खड्डयात पडले – ड्रेनेज लाईनचे काम सुरू असताना तिघे कर्मचारी खड्डयात पडल्याची घटना मंगळवारी (दि. ४) संध्याकाळी सातच्या सुमारास नांदेड सिटी कंपाऊंडबाहेर घडली आहे. माहिती मिळताच अग्निशमक दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य राबविले. जेसीबीच्या साह्याने माती हटवून दोघा कामगाराला खड्डयातून बाहेर काढण्यात अग्निशमक दलाला यश आले आहे. उर्वरित एका कर्मचार्‍याच्या बचावकार्यासाठी रात्री उशिरापर्यंत अग्निशमक दलाकडून प्रयत्न सुरू होते.

मुख्यमंत्री वॉररुमध्ये मुख्यमंत्र्यांनी घेतला 30 प्रकल्पांचा आढावा – सविस्तर बातमी 

नांदेड सिटी कंपाऊंड वॉलच्या बाहेरील बाजूस महापालिकेच्या ड्रेनेज लाईनचे काम सुरू होते. त्यावेळी काम सुरू असताना तिघे कामगार ड्रेनेज लाईनच्या खड्ड्यात अडकले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांसह अग्निशमक दलाच्या जवानांनी तातडीने मदतकार्य राबविले. अवघ्या काही मिनीटांमध्ये दोन कामगारांना बाहेर काढले. त्यांच्या अंगावर माती पडल्यामुळे आणि गुदमरल्याने कामगाराला श्वसनाचा त्रास झाला. मात्र, त्याला जागेवरच कृत्रिम श्वास देण्याचे उपकरण उपलब्ध करण्यात आले होते. दरम्यान, अग्निशमक दलाकडून रात्री उशिरापर्यत एका कामगाराला बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते. आपत्कालीन बचाव पथक दाखल झाले असून मदतकार्य वेगाने सुरू आहे.

म्हणून तिघेही वाचले

ड्रेनेज लाईन पाईप टाकण्याचे काम सुरू असताना तिघे कामगार मातीजवळच उभे होते. त्यावेळी अचानकपणे माती घसरल्यामुळे तिघेही खड्डयात पडले. मात्र, जेसीबी चालकासह इतर नागरिकांनी ही घटना पाहिल्यामुळे त्यांनी तातडीने अग्निशमक दलाला पाचारण केले. तत्पुर्वीच त्यांनी मदतकार्य सुरू केले होते. त्यामुळे दोन कामगारांना खड्डयातून बाहेर काढले असून, एका कामगाराचा जीव वाचविण्यासाठी रात्री उशिरापर्यंत दलाचे जवान कार्यरत होते. अग्निशमक दलाचे अधिकारी व कर्मचारी मिळून ३५ ते ४० जण बचाव कार्यात सहभागी झाले होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×