Breking News
फ्लाईंग जिप्सी कॅफेला दणका, तोपर्यंत बंद ठेवणारपुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे ‘अतिउत्कृष्ट सेवा पदक’हाफकिन संस्थेला गतवैभव मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध – राज्यमंत्री योगेश कदममहा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावेसिंहगड रस्ता भागात घरातून बेकायदा मद्य विक्री; आरोपीला अटकडाॅक्टरांकडे १० लाखांची खंडणी मागणाऱ्या तोतया पत्रकारांविरुद्ध गुन्हाजलसंधारण दिनानिमित्त पुणे जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजनशीघ्र हस्तक्षेपण व शाळापूर्व तयारीसाठी क्रॉस डिसॅबिलिटी अभ्यासक्रम आराखड्याचे लोकार्पणपुणे जिल्ह्यातील जलसंधारण चळवळ : एक दृष्टीक्षेप…!!टेम्पोच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

भगवान जगन्नाथ रथयात्रेनिमित्त मध्यभागात आज वाहतूक बदल

पुण्यात विविध भागात वाहतूक बदलाचे आदेश

दुपारी १ ते सायंकाळी ७.३० पर्यंत वाहतूक वळविणार

marathinews24.com

पुणे – आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघाकडून (इस्काॅन) रविवारी (१९ जुलै) भगवान जगन्नाथ रथयात्रा काढण्यात येणार आहे. रथयात्रेनिमित्त मध्यभागातील वाहतूक व्यवस्थेत दुपारी एक ते सायंकाळी साडेसात या वेळेत बदल करण्यात येणार आहेत.

ऑनलाइन ट्रेडिंग’च्या मोहात शेजाऱ्यांच्या घरात घरफोडी – सविस्तर बातमी

‘टिळक रस्त्यावरील स. प. महाविद्यालय चौकातून रथयात्रेचा प्रारंभ होणार आहे. टिळक रस्ता, बाजीराव रस्ता, शनिपार चौक, नगरकर तालीम चौक, लक्ष्मी रस्ता, उंबऱ्या गणपती चौक (शगुन चौक), रमणबाग चौक, ओंकारेश्वर मंदिर, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पूल, झाशीची राणी लक्ष्मीबाई चौक, जंगली महाराज रस्ता, डेक्कन जिमखाना, खंडोजीबाबा चौक, टिळक चौक, टिळक रस्ता या मार्गाने रथयात्रा जाणार आहे. स. प. महाविद्यालयाजवळ रथयात्रेची सांगता होणार आहे.

रथयात्रेनिमित्त रविवारी दुपारी एक ते सायंकाळी साडेसात या वेळेत वाहतूक बदल करण्यात येणार आहेत. वाहतूक बदल तात्पुरत्या स्वरुपात करण्यात आले असून, वाहनचालकांनी सहकार्य करावे’, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डाॅ. संदीप भाजीभाकरे यांनी केले आहे.

स. प. महाविद्यालयातून रथयात्रा सुरू झाल्यानंतर टिळक रस्त्याने स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी लालबहाद्दुर शास्त्री रस्ता, सेनादत्त चौक, दांडेकर पूल चौकातून इच्छितस्थळी जावे. पूरम चौकातून टिळक रस्त्याकडे येणाऱ्या वाहनचालकांनी मित्रमंडळ चौकातून इच्छितस्थळी जावे. रथयात्रा पूरम चौकातून बाजीराव रस्त्यावर आल्यानंतर वाहनचालकांनी पूरम चौकातून टिळक रस्तामार्गे इच्छितस्थळी जावे. रथयात्रा लक्ष्मी रस्ता परिसरात आल्यानंतर वाहनचालकांनी बाजीराव रस्ता, अप्पा बळवंत चौक, शनिवार वाडा या मार्गाने इच्छितस्थळी जावे. रमणबाग ते ओंकारेश्वर दरम्यान रथयात्रा आल्यानंतर वाहन चालकांनी नदीपात्रातील रस्ता किंवा लक्ष्मी रस्त्याचा वापर करावा.

डेक्कन जिमखाना भागात दुचाकी चोरणारे अटकेत

डेक्कन जिमखाना भागातून दुचाकी चोरुन पसार झालेल्या चोरट्यांना पोलिसांनी अटक केली. चोरट्यांकडून दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या. आकाश अरविंद गुजर (वय २८ ,रा. आंबेगाव खुर्द), इब्राहिम इस्माईल शेख (वय ३५, रा. भागोदयनगर, कोंढवा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

डेक्कन जिमखाना भागातून एक दुचाकी चोरीला गेल्याची घटना नुकतीच घडली होती. याबाबत डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपास करुन गुजर आणि शेख यांना पकडले. चौकशीत दोघांनी दोन दुचाकी चोरल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्याकडून दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रुणाल मुल्ला, पोलीस निरीक्षक सपना देवताळे, उपनिरीक्षक अजय भोसले, योगेश मोरे, दत्तात्रय शिंदे, प्रशांत पवार, राजेंद्र मारणे, सचिन गायकवाड, सागर घाडगे, वसीम सिद्दीकी, धनश्री सुपेकर यांनी ही कारवाई केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×