Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

पुण्यात तिरंगा रॅली निमित्त वाहतुकीत बदल

उद्या दुपारी दोनपासून मार्ग बंद

marathinews24.com

पुणे – शहरात तिरंगा गौरव समितीच्यावतीने मंगळवारी (दि. ११) तिरंगा रॅलीचे आयोजन केले आहे. त्यापार्श्वभूमीवर वाहतूकीत बदल केला आहे. दुपारी दोन वाजल्यापासून रॅली संपेपर्यंत संबंधित परिसरातील वाहतूक वळवण्यात आली आहे. प्रामुख्याने मध्यवर्ती फर्ग्युसन कॉलेज रोड तसेच रॅलीच्या मार्गाला जोडणारे काही उपरस्ते वाहतुकीसाठी तात्पुरते बंद ठेवले जाणार आहेत . त्यामुळे संबंधित मार्गावरील वाहन चालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी केले आहे.

तंत्रज्ञानाच्या माध्यमातून २४x७ जनतेशी जोडले जाणे ही काळाची गरज – मुरलीधर मोहोळ – सविस्तर बातमी

तिरंगा रॅली ललित महल हॉटेल चौक ते ज्ञानेश्वर महाराज पादुका चौक, तुकाराम महाराज पादुका चौक, गुडलक चौक आणि गरवारे चौक या मार्गावरून जाणार आहे. त्यामुळे खंडोजीबाबा चौक ते गरवारे ब्रिज चौक हा मार्ग बंद राहणार आहे. स्वारगेटकडून पुणे विद्यापीठाकडे जाणार्‍या वाहन चालकांनी अलका चौक, खंडोजीबाबा चौक, वीर सावरकर चौकाकडे न जाता भाऊसाहेब पाटील चौक, ना. सी. फडके चौक, मंगळवारवाडा चौक, सेनादत्त चौक, बालशिवाजी, म्हात्रे पूल, नळ स्टॉप आणि लॉ कॉलेज रोडमार्गे मार्गस्थ व्हावे.

स्वारगेटकडून खडकी/जुना पुणे-मुंबई महामार्गाकडे जाणार्‍या वाहनांसाठी भाऊसाहेब पाटील चौक, पुरम चौक, बाजीराव रोड, गाडगीळ पुतळा, कुंभार वेस आणि आरटीओ चौक हा पर्यायी मार्ग आहे. गरवारे चौक ते चाफेकर चौक (एफ.सी. रोड) तसेच गरवारे चौक ते तुकाराम पादुका चौक, ज्ञानेश्वर पादुका चौक, ललित महल चौक ते चाफेकर चौक मार्गांवरही वाहतूक बंद ठेवली आहे. त्यामुळे गरवारे चौक परिसरातून जाणार्‍या वाहनांसाठी लॉ कॉलेज रोड, एस.बी. रोड, विद्यापीठ चौक तसेच भांडारकर रोड, बी.एम.सी.सी. रोड, चतु:शृंगी रोड, मॉडेल कॉलनी रोडचा वापर करावा.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×