पुणे पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांचे आदेश

marathinews24.com

पुणे – शहर पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिले. पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार शहरातील १८ पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. कोथरूड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने यांची फरासखाना पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. फरासखाना पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखेचे निरीक्षक अरुण घोडके यांची कोथरूड पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती केली आहे.

फुलेप्रेमी कवीच्या कुटुंबाला तीन लाखांची आर्थिक मदत – सविस्तर बातमी 

डेक्कन पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशा निंबाळकर यांची काळेपडळ पोलीस ठाण्यात नेमणुक केली आहे. तर वाहतूक शाखेतील पोलीस निरीक्षक रुणाल मुल्ला यांची डेक्कन पोलीस ठाण्यात वरिष्ठ निरीक्षकपदी नियुक्ती केली आहे. काळेपडळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मानसिंग पाटील यांची भारती विद्यापीठ पोलीस ठाणे, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांची विश्रांतवाडी पोलीस ठाणे, विश्रांतवाडी पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस यांची लष्कर पोलीस ठाण्यात नेमणूक केली आहे.

खडक पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखेचे निरीक्षक संजय करनूर यांची नऱ्हे पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे. लष्कर पोलीस ठाण्याचे गुन्हे शाखेतील निरीक्षक प्रदीप पवार यांची लोणी काळभोर पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे, राहुलकुमार खिलारे, भाऊसाहेब पाटील, आसाराम शेटे यांची पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेत बदली करण्यात आली आहे. गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक पंडीत रेजितवाड यांची वानवडी पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी नेमणूक करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक उत्तम नामवाडे यांची विशेष शाखेत, पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप यांची विश्रामबाग पोलीस ठाणे, तसेच वाहतूक शाखेतील पोलीस निरीक्षक संगीता जाधव यांची वानवडी पोलीस ठाण्यात बदली केली आहे. पणे पोलीस दलात बदली होऊन रुजू झालेले पोलीस निरीक्षक संतोष कोळी यांची गुन्हे शाखेत बदली करण्यात आली आहे. कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार घाडगे यांची राज्य गुन्हे अन्वेषण विभागात (सीआयडी) बदली झाली आहे. विश्रांतवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगेश हांडे यांची मुंबई पोलीस दलात बदली करण्यात आल्यानंतर त्यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×