युनिट दोनची कामगिरी
marathinews24.com
पुणे – वाहन तोडफोड करून फरार झालेल्या दोन आरोपींना गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने सिंहगड रोड परिसरातून ताब्यात घेतले. नितिन रमेश उदगिरे (वय २५, रा. पद्मावती, पुणे) आणि अनिकेत सुरेंद्र गायकवाड (वय ३०, रा. भन्साळी कॉम्प्लेक्स, सिंहगड रोड, पुणे) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यावर पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
सहायक नगर रचनाकाराची २ कोटी ७८ लाखांची बेहिशेबी मालमत्ता; दाम्पत्यावर गुन्हा दाखल – सविस्तर बातमी
गुन्हे शाखा युनिट दोनचे अधिकारी व अंमलदार पाहिजे आरोपींचा शोध घेत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार कुंदन शिंदे, महेश मंडलिक, संदिप शिर्के यांना पर्वती पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी सिंहगड रोड परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांच्या आदेशानुसार पथकाने सिंहगड रोड परिसरात शोध घेतला.
आरोपी नितिन उदगिरे आणि अनिकेत गायकवाड यांना ताब्यात घेतले. कारवाईसाठी दोघांना पर्वती पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले. ही कामगिरी पोलीस उपायुक्त गाहर हसन, सहायक पोलीस आयुक्त शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, पोलीस निरीक्षक अविनाश माने, पोलीस उपनिरीक्षक तेजश्री पवार,उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी, अंमलदार कुंदन शिंदे, महेश मंडलिक, संदिप शिर्के, उज्वल मोकाशी, शंकर नेवसे, नागानाथ राख, सर्जेराव सरगर, विजयकुमार पवार, साधना ताम्हाणे, विद्या शिंदे, आशिष यादव, शंकर कुंभार, योगेश मांढरे, ओमकार कुंभार, शिवानंद कायगुडे, विनायक वगारे यांनी केली.






















