हप्ता न दिल्याने दोघांवर तीक्ष्ण शस्त्राने वार

हप्ता न दिल्याने दोघांवर तीक्ष्ण शस्त्राने वार

खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 

marathinews24.com

पुणे – हप्ता न दिल्याने दोघांवर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना खडकीतील रेंजहिल्स परिसरात घडली. आरोपींनी शस्त्र उगारुन दहशत माजविली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली. गंगाराम तोटाप्पा गायकवाड (वय ४०, रा. सावित्री विहार, रेंजहिल्स, खडकी), परशुराम चौडाप्पा गायकवाड (वय ३५) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी निहाल गवळी (वय २०, रा. सुरती मोहल्ला, खडकी), पृथ्वी उर्फ नानू पवार (वय २०) यांना अटक करण्यात आली. या प्रकरणी त्यांच्याबरोबर असलेल्या एका साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत गायकवाड यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मद्य विक्री दुकानातील कामगाराला मारहाण – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगाराम गायकवाड आणि त्यांचा मित्र परशुराम गायकवाड हे ७ जून रोजी सायंकाळी सातच्या सुमाारास खडकीतील रेंजहिल्स परिसरातील बोगद्याजवळ थांबले होते. आरोपी गवळी, पवार आणि साथीदार तेथे आले. आरोपींनी गायकवाड यांना शिवीगाळ केली. हप्ता का दिला नाही ? अशी विचारणा करुन आरोपींनी त्यांना शिवीगाळ केली. त्यांच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. आरोपींनी शस्त्रे उगारून परिसरात दहशत माजविली. आरोपींनी केलेल्या मारहाणीत गायकवाड जखमी झाले. पसार झालेल्या दोघा आरोपींन पोलिसांनी अटक केली. पोलीस उपनिरीक्षक गाडीलकर तपास करत आहेत.

दरोड्याच्या तयारीतील चोरट्यांची टोळी गजाआड

पुणे- दरोड्याच्या तयारीत असलेल्या सराइतांना आंबेगाव पोलिसांनी अटक केली. मुंबई-बेंगळुरु बाह्यवळण मार्गावरील दरीपूल परिसरात ही कारवाई करण्यात आली. आरोपींकडून तीक्ष्ण शस्त्रे, मिरची पूड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अभय उर्फ सोन्या अशोक निसर्गंध (वय २२), अमर अशोक निसर्गंध (वय २४, दोघे रा. सिद्धीविनायक सोसायटी, वाघजाईनगर, आंबेगाव खुर्द), प्रथम नंदू गवळी (वय २४, रा. तळजाई पठार, धनकवडी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलीस हवालदार हरीष गायकवाड यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अभय निसर्गंध, त्याचा भाऊ अमर, साथीदार प्रथम हे सराईत आहेत. आरोपी अभय याला शहर आणि जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. तिघे जण दरोडा घालण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना सोमवारी (८ जून) दुपारी मिळाली. मुंबई-बेंगळुरू बाह्यवळण मार्गावर तिघे जण थांबले होते. पोलिसंनी सापळा लावून तिघांना पकडले. त्यांच्याकडून तीक्ष्ण शस्त्रे, मिरची पूड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक शिंदे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×