वाहन चोराकडुन दोन दुचाकी जप्त, भारती विद्यापीठ पोलिसांची कामगिरी
marathinews24.com
पुणे– पार्किंगमधील दुचाकी चोरणार्याला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून दोन दुचाकी जप्त करण्यात पथकाला यश आले आहे. किरण लक्ष्मण जांभळे (वय ३६ रा. अपर ओटा, ए ३५ रुम नंबर ४, महाडीक मैदानाजवळ, अपर इंदीरानगर, पुणे ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. स्पाईस गार्डन हॉटेल लेकटाऊन परिसरात पार्क केलेली दुचाकी चोरट्याने चोरून नेली होती. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगांवकर यांनी तपास पथकाला वाहन चोरट्याचा शोध घेण्याचे आदेश दिले होते.
चोर राजासह तिघांना अटक, घरफोडीचे ८ उघडकीस – सविस्तर बातमी
पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, किरण साबळे हे आरोपीचा शोध घेत होते. त्यावेळी पथकाला आरोपी किरण जांभळे याची माहिती मिळाली. त्यानुसार त्याला ताब्यात घेत दुचाकी जप्त केली. यापुर्वीही त्याने चोरी केलेल्या दुचाकीसह दोन दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहे. ही कामगिरी अपर आयुक्त प्रविणकुमार पाटील, उपायुक्त स्मार्तना पाटील, एसीपी राहुल आवारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम पु.साळगावकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राहुल कुमार खिलारे, पोलीस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी, पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, किरण साबळे, सचिन सरपाले, महेश बारवकर, मंगेश पवार, सचिन गाडे, नीलेश खैरमोडे, तुकाराम सुतार, संदीप आगळे यांनी केली.