Breking News
आवडते काय आणि येते काय, यातील फरक ओळखा-ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामलेआमदार संजय गायकवाडांविरोधात गुन्ह्याच्या मागणीसाठी रोहित पवारांचा कोथरूड ठाण्यात ठिय्याधर्मादाय आयुक्तांची परवानगी न घेता संस्थेची ५० कोटींची जमीन तारणदिशाहीन नियोजन व एफएसआय’च्या अनिर्बंध अतार्किक मंजुऱ्यां मुळे ‘पुणे वाहतुक कोंडीच्या’ संकटात…!भरती परीक्षा सुधारणांसाठी शनिवारी पुण्यात सल्लामसलतजिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली चाकण एमआयडीसी परिसरातील पायाभूत सुविधा समितीची बैठक संपन्नएमडी विक्रीच्या तयारीतील त्रिकुटाला बेड्यागणेश विसर्जन मिरवणुकांमधून तंबाखू व अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान राबवावे- ज्योती कदमपुण्यातील सराईतांना दणका, २२ जण तडीपारपुण्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दोन सराईत तडीपार

पुणे पोलीस दलातील २५ अधिकारी-अंमलदारांना केंद्रीय गृहमंत्र्यांचे सेवा पदक

पुणे पोलीस दलातील २५ अधिकारी-अंमलदारांना केंद्रीय गृहमंत्र्यांचे सेवा पदक

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांचा सन्मान

marathinews24.com

पुणे – स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री भारत सरकार यांचे अतिउत्कृष्ट सेवा पदक आणि उत्कृष्ट सेवा पदक जाहीर झाले आहे. पोलीस दलामध्ये दीर्घकालीन, निष्कलंक आणि उत्कृष्ट सेवा बजावल्याबद्दल पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील २५ अधिकारी व अंमलदारांना पदक जाहीर झाले आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे यांच्यासह ९ जणांना अतिउत्कृष्ट सेवा पदक जाहीर झाले आहे. तर उत्कृष्ट सेवा बजावल्याबद्दल १६ जणांना पदक जाहीर झाले आहे. तर पोलीस उपअधीक्षक श्रीजितेंद्र आनंद कदम (सीआयडी) यांना राष्ट्रपतींचे गुणवत्तापूर्ण सेवेचे पोलीस पदक जाहीर झाले आहे.

चाकण एमआयडीसीतील सुविधा व वाहतूक सुधारणांना गती- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी – सविस्तर बातमी 

अतिउत्कृष्ट सेवा पदक मिळालेल्यांमध्ये सहायक पोलीस फौजदार दिलीप दिगंबर झानपुरे, नितीन तुळशीराम जगताप, राजस हुसेन शेख, राजेंद्र आत्माराम पालांडे, सत्यवान बबन साबळे, संतोष भगवान कुचेकर यांचा समावेश आहे. तर उत्कृष्ट सेवा पदक मिळालेल्यांमध्ये सहपोलीस आयुक्त संजय दराडे, पोलीस निरीक्षक कैलास भिकू डाबेराव, स्वप्नाली चंद्रकांत शिंदे, उमेश अंबादास गित्ते, सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत लोहकरे, पोलीस उपनिरीक्षक अमित अधिकराव सिद-पाटील यांचा समावेश आहे. तर पोलीस हवालदार सुधीर अंकुश इंगळे, योगराज हरिश्चंद्र घाटगे, मच्छिंद्र कांतीलाल भंडारे, सचिन सुभाष अहिवळे, राहुल रामचंद्र माने, संदीप राम पाटील, शैलेश शरद सुर्वे, सत्यवान ज्ञानोबा ठोंबरे, महिला हवालदार धनश्री विजय कामठे, शिपाई हनुमंत विलास थोपटे यांनाही उत्कृष्ट सेवा पदक जाहीर झाले आहे.

दीर्घकाळ प्रामाणिकपणे आणि उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या सेवेला मिळालेल्या या गौरवामुळे पुणे पोलीस दलात आनंदाचे वातावरण आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पदक जाहीर झालेल्या अधिकारी- कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×