Breking News
Shubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एकLullanagar Roof Collapse : पुण्यात पत्र्याचे आच्छादन कोसळून दोघे जखमीShirur Crime News : शिरुरमध्ये हाॅटेल चालकाचा गोळ्या झाडून खूनLohegaon Hostel Sealing : पुण्यातील लोहगावामधील ११ विनापरवाना हॉस्टेल सील

युजर चार्जेसविरोधातील आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा

युजर चार्जेसविरोधातील आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा

दुहेरी आकारणीचा व्यापाऱ्यांचा आरोप; मार्केट यार्डमधील व्यापारी, हमाल व वाहतूक संघटनांचा संघर्षात सहभाग, अन्यायकारक शुल्काविरोधात लढा तीव्र होणार

marathinews24.com

पुणे – कृषी उत्पन्न बाजार समितीकडून आकारण्यात येणाऱ्या युजर चार्जेसविरोधात दि पूना मर्चेंटस् चेंबरने पुकारलेल्या आंदोलनाला बाजार आवारातील विविध व्यापारी व कामगार संघटनांनी पाठिंबा जाहीर केला आहे. यामुळे युजर चार्जेसच्या मुद्द्यावर व्यापारी वर्गाची भूमिका अधिक आक्रमक होत असल्याचे दिसून येत आहे.

अन्न व औषध प्रशासनाकडून आंबेगाव व खेड तालुक्यात ५ ठिकाणी धडक कारवाई – सविस्तर बातमी 

कृषी उत्पन्न बाजार समितीने १९ मार्च २०१५ रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार नियमनातून वगळलेल्या आणि नियमनात नसलेल्या व्यवसायांवर प्रति भूखंड वार्षिक एक लाख रुपयांची देखभाल आकारणी लागू केली होती. ही आकारणी आजतागायत सुरू असून, त्यानंतर २०२२ पासून पूर्वलक्षी प्रभावाने त्याच कारणासाठी युजर चार्जेस आकारण्याचा निर्णय घेण्यात आल्याने व्यापाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.

एकाच सेवेसाठी दुहेरी आकारणी केली जात असल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे. या निर्णयामुळे बाजार आवारातील व्यावसायिकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत असून भविष्यात व्यापार टिकविणे कठीण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेषतः मार्केट यार्डच्या गूळ-भुसार विभागातील व्यापाऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण असून, भविष्यात व्यवसाय कसा चालवायचा हा प्रश्न निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे.

दि पूना मर्चेंटस् चेंबरच्या आंदोलनाला ग्राहक पंचायतचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सूर्यकांत पाठक, पुणे जिल्हा रिटेल व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सचिन निवंगुणे, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडते असोसिएशनचे अध्यक्ष सौरभ कुंजीर, पूना डिस्ट्रिक्ट मोटार गुडस् ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र खेडेकर व शशिकांत डोंबे तसेच हमाल पंचायतचे अध्यक्ष गोरख मेंगडे यांनी पाठिंबा दर्शविला आहे.

चेंबरने हाती घेतलेल्या आंदोलनात आवश्यकतेनुसार सहभागी होण्याची तयारीही या संघटनांनी दर्शविल्याची माहिती दि पूना मर्चेंटस् चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया यांनी दिली. बाजार आवारातील सर्व घटकांच्या हितासाठी हे आंदोलन सुरू असून अन्यायकारक आकारणीविरोधात लढा सुरूच राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×