Breking News
फ्लाईंग जिप्सी कॅफेला दणका, तोपर्यंत बंद ठेवणारपुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे ‘अतिउत्कृष्ट सेवा पदक’हाफकिन संस्थेला गतवैभव मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध – राज्यमंत्री योगेश कदममहा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावेसिंहगड रस्ता भागात घरातून बेकायदा मद्य विक्री; आरोपीला अटकडाॅक्टरांकडे १० लाखांची खंडणी मागणाऱ्या तोतया पत्रकारांविरुद्ध गुन्हाजलसंधारण दिनानिमित्त पुणे जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजनशीघ्र हस्तक्षेपण व शाळापूर्व तयारीसाठी क्रॉस डिसॅबिलिटी अभ्यासक्रम आराखड्याचे लोकार्पणपुणे जिल्ह्यातील जलसंधारण चळवळ : एक दृष्टीक्षेप…!!टेम्पोच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांचा २३ व २४ जुलै रोजी पुणे दौरा

महिला सुरक्षा, सायबर स्टॉकिंग, एआय प्रशिक्षण आणि संवेदनशील पत्रकारितेवर दोन दिवस विविध कार्यक्रम

marathinews24.com

पुणे – राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती विजया रहाटकर या २३ व २४ जुलै २०२६ रोजी पुण्याच्या दोन दिवसीय दौऱ्यावर येत असून, महिला सुरक्षा, डिजिटल सक्षमीकरण, करिअर मार्गदर्शन, कौटुंबिक समुपदेशन आणि संवेदनशील पत्रकारिता आदी विषयांवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

बिटवाईज–मर्सिडीज बेंझ परिसरात उड्डाणपुलाची मागणी – सविस्तर बातमी

२३ जुलै रोजी यशदा, बाणेर रोड येथे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सहकार्याने ‘पाठलाग आणि सायबर पाठलाग’ (स्टॉकिंग आणि सायबर स्टॉकिंग) प्रतिबंध विषयावरील जनजागृती कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात महिलांविरोधातील गुन्ह्यांबाबत कायदेशीर संरक्षण, तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया आणि संबंधित यंत्रणांमधील समन्वय याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

त्यानंतर येरवडा येथील अण्णाभाऊ साठे सभागृहात राष्ट्रीय महिला आयोगाच्या SHEServes उपक्रमांतर्गत तरुणींना सैन्य, नौदल आणि हवाई दलातील करिअरच्या संधी, पात्रता, निवड प्रक्रिया आणि तयारीबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे.

सायंकाळी ज्ञान प्रबोधिनी येथे प्री-मॅरिटल काउन्सेलिंग सेंटरचे उद्घाटन करण्यात येणार असून, विवाहपूर्व समुपदेशन, संवाद कौशल्य आणि सुदृढ कौटुंबिक नातेसंबंधासाठी आवश्यक मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येईल.

दि. २४ जुलै रोजी विश्वकर्मा विद्यापीठ येथे राष्ट्रीय महिला आयोगाच्या ‘यशोदा एआय’ उपक्रमांतर्गत बचत गटातील महिलांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), डिजिटल साक्षरता, सायबर सुरक्षा, ऑनलाइन आर्थिक सुरक्षितता आणि डीपफेक्ससह नव्या तंत्रज्ञानाच्या सुरक्षित वापराबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे.

यानंतर रानडे इन्स्टिट्यूट ऑफ जर्नालिझम येथे पत्रकारिता विद्यार्थ्यांसाठी ‘जेंडर जस्टिस आणि संवेदनशील पत्रकारिता’ या विषयावरील संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, महिलांविषयी संवेदनशील वृत्तांकन, जबाबदार पत्रकारिता आणि सामाजिक उत्तरदायित्व यावर चर्चा होणार आहे, असे राष्ट्रीय महिला आयोगाने कळविले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×