Breking News
Kharadi Bypass Robbery Case : पादचारी जेष्ठेच्या अंगावर पाणी उडवून लुटलेLost Mobile Recovery : वाघोली पोलिसांनी तक्रादारांच्या चेहर्‍यावर फुलवले हसूPune Crime News : पुण्यात पार्किंगच्या वादातून हाणामारीच्या घटनाBopdev Ghat Car Accident : बोपदेव घाटात वाहनाच्या धडकेत मोटार दरीत कोसळलीSugarcane Transport Safety Rules : साखर कारखान्यांच्या ऊस वाहतुकीसाठी आरटीओचे सुरक्षा नियमPune Election 2026 : पदवीधर, शिक्षक मतदारसंघांसाठी मतदान साहित्य घेऊन पथके मतदान केंद्रांकडे रवानाPune Crime News : खुनाच्या प्रयत्नात ५ वर्षांपासून फरार आरोपीला बेड्याPune Domestic Harassment Cases : कौटुंबिक छळामुळे पुण्यात दोन महिलांनी केली आत्महत्याSeva Sankalp Abhiyan : ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत’ बारामती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध जनजागृतीपर उपक्रमDeposit Fraud : छत्रपती मल्टीस्टेट सोसायटी प्रकरण; ठेवीदारांनी पोलिसांकडे तक्रार करण्याचे आवाहन

Lost Mobile Recovery : वाघोली पोलिसांनी तक्रादारांच्या चेहर्‍यावर फुलवले हसू

Lost Mobile Recovery

तक्रादारांचे ५१ मोबाइल, टॅब दिले मिळवून

marathinews24.com

पुणे – Lost Mobile Recovery : शहरातील विविध भागात कामानिमित्त फिरताना गडबडीत गहाळ झालेले तब्बल ५१ महागडे मोबाईल, टॅब पुन्हा तक्रारदारांना मिळवून देण्यात वाघोली पोलिसांनी बाजी मारली आहे. नागरीकांना मोबाइल मिळवून देत त्यांच्या चेहर्‍यावर हास्य फुलवले आहे. संबंधित मोबाइल १२ लाख ७५ हजार रुपये किंमतीचे असून, नुकतेच तक्रारदारांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांच्या हस्ते मोबाइल वितरित करण्यात आले.

साखर कारखान्यांच्या ऊस वाहतुकीसाठी आरटीओचे सुरक्षा नियम – सविस्तर बातमी 

मोबाइल हरवल्यानंतर (Lost Mobile Recovery) नागरिकांनी ऑनलाइनरित्या तक्रार केली होती. यासंदर्भात नागरिकांनी पुणे पोलिसांच्या वेबसाइटवर लॉस्ट अ‍ॅण्ड फाउंड पोर्टलवर तक्रारींची ऑनलाइन नोंद केली होती. त्यानुसार तांत्रिक विश्लेषणाद्वारे संबंधित पोलीस ठाण्यातील कर्मचार्‍यांकडून मोबाइलची माहिती काढण्यात आली. संबंधित वापरकर्त्यांसह मोबाईल कंपन्यांना पत्रव्यवहार केला. त्याद्वारे गहाळ झालेले ५१ मोबाईल विविध भागांत कार्यरत असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार पोलिसांनी मोबाईल वापरकर्त्याना संपर्क करून मोबाईल जमा केले. हरविलेले मोबाईल परत मिळाल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त करीत पोलिसांचे आभार मानले आहेत.

वाघोली पोलीस ठाण्यात गुरूवारी (दि. २२) आयोजित कार्यक्रमात नागरिकांना मोबाईल सुपुर्द केले. संबंधित सायबर विभागातील कर्मचार्‍यांनी पाठपुरावा करीत लाखो रूपयांचे मोबाईल परत मिळवून दिल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले. ही कामगिरी अपर आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त अबिनाश कुमार, सहायक आयुक्त अनिता मोरे, वरिष्ठ निरीक्षक नंदकुमार गायकवाड, पोलीस निरीक्षक मंगेश जगताप, पोलीस निरीक्षक पल्लवी मेहेर, सतीश बिरादार, वृंदावणी चव्हाण यांनी केली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×