Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

संशोधक विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत मंत्रालयस्तरावर पाठपुरावा करु

संशोधक विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत मंत्रालयस्तरावर पाठपुरावा करु

मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आश्वासन

marathinews24.com

पुणे – संशोधक विद्यार्थी समन्वय कृती समितीच्या मागण्यांबाबत मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करु, असे आश्वासन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी (दि.२१) दिले. संशोधक विद्यार्थी समन्वय कृती समितीच्या शिष्टमंडळाने पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली. आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्याचा निर्णय समन्वय समितीने घेतला.

औद्योगिक क्रांतीमध्ये ‘जिनॉमिक्सचे महत्व- डॉ. शां. ब. मुजुमदार – सविस्तर बातमी 

सारथी, बार्टी, महाज्योती, अमृत, आर्टी आदी संस्थांच्या शिष्यवृत्तीसाठी संशोधक विद्यार्थी समन्वय कृती समितीच्या वतीने डेक्कन चौकात आंदोलन सुरु असून; त्यावर मार्ग काढण्यासाठी समितीच्या शिष्टमंडाळाने आज उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली. या भेटीत सविस्तर चर्चा होऊन अतिशय सकारात्मक चर्चा झाली. बार्टी, सारथी, महाज्योती, आर्टी या संस्थांमध्ये विद्यार्थी संख्या, प्रवेश प्रक्रिया, शिष्यवृत्ती यांची संख्या ठरविणे, शिष्यवृत्तीसाठी जाहिरात काढणे आणि गुणवत्ता वाढ यासंदर्भात मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. या समितीचा अहवाल आता प्राप्त झालेला आहे. त्या संदर्भात मंत्रालय स्तरावर निर्णय घेण्यात येईल, असे यावेळी आश्वस्त केले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क साधून मंत्रालयात मुख्य सचिवांसोबत बैठक घेऊन मार्ग काढण्याबाबत चर्चा केली. पाटील यांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे घेण्याचा निर्णय समन्वय समितीने घेतला. यावेळी युवासेना नेते किरण साळी,नितीन आंधळे, पूजा झोळे, विद्यार्थी भारत पवार, अंकुश चौगुले, परिमल कुंभार, अभाविपचे राधेय बाहेगव्हाणकर, अलोक पवार, सई थोपटे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×