Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

मोबाइल चॅटींगबाबत जाब विचारल्याने पत्नीचा खुनाचा प्रयत्न

लक्ष्मी रस्त्यावर महिलेच्या पिशवीतून दागिने चोरीला

कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – मोबाइलवरील संवादाबाबत (चॅटींग) जाब विचारणाऱ्या पत्नीसह मुलाला बॅटने मारहाण करण्यात आल्याची घटना पुणे स्टेशन परिसरातील क्वीन्स गार्डन येथे घडली. पत्नीचा गळा आवळून खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. याप्रकरणी विजय फुलचंद कारंडे (वय ४०, रा. क्वीन्स गार्डन, पुणे स्टेशनजवळ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारंडे याने केलेल्या मारहाणीत त्याची पत्नी रुपाली (वय ३०) आणि मुलगा जखमी झाले आहेत. याबाबत पत्नीने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

बाह्यवळण मार्ग चार तास रोखून धरल्यानंतर सौम्य लाठीमार – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० एप्रिल रोजी रात्री आठच्या सुमारास ही क्वीन्स गार्डन परिसरातील आरोपीच्या घरात ही घटना घडली. आरोपी हा मोबाइलवर चॅटींग करत होता. त्यावेळी पत्नीने त्याला जाब विचारला. या कारणावरुन त्याने पत्नीला शिवीगाळ केली. पत्नी आणि मुलाला त्याने बॅटने मारहाण केली, तसेच पत्नीचा गळा आवळून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र शिंदे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×