Breking News
ठेकेदाराच्या कुटुंबाला धाक दाखवून २७ लाखांची घरफोडीमहात्मा जोतीराव फुले द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त पशुसंवर्धन विभागाचे विविध उपक्रमपुण्यात नवले ब्रीज परिसरात वेश्या व्यवसायाचा पर्दाफाशअल्पवयीन मुलाशी अश्लील कृत्य; तिघांविरुद्ध गुन्हाकात्रजमध्ये अल्पवयीनावर शस्त्राने वार करून खून‘मिशन क्रॅकडाऊन’ अंतर्गत बेकायदा धंद्यांवर कारवाईदिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त बारामती एमआयडीमध्ये १ हजार वृक्ष लागवडीचे नियोजन-प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटीलअंगणवाडीच्या पोषण आहारात बदल; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलावविद्यार्थ्यांच्या सहभागामुळे एसआयआर मोहिमेला गतीडंपरच्या धडकेत पदाचारी ठार, पुणे महापालिकेजवळील अपघात

पतीच्या अनैतिक संबंधामुळे महिलेची आत्महत्या

आईच्या मृत्यूच्या धक्क्याने तरुणाची आत्महत्या

पतीविरुद्ध सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

 marathinews24.com

पुणे – पतीचे अनैतिक संबंध असल्याने जाब विचारणाऱ्या महिलेचा छळ केल्याने तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सिंहगड रस्ता परिसरात घडली. महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मोनिका सुनील कांबळे (वय २९, रा. लक्ष्मी गंगा हाईट्स, सनसिटी, आनंदनगर, सिंहगड रस्ता) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत मोनिका यांच्या भावाने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सुनील ज्ञानोबा कांबळे (रा. लक्ष्मी गंगा हाईटस्, सनसिटी, आनंदनगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यात तरुणाकडून १० लाखांचा गांजा जप्त – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोनिका मूळच्या बीडच्या आहेत. त्यांचा विवाह सुनील कांबळे याच्याशी २०२३ मध्ये झाला. विवाहानंतर पती उशीरा घरी यायचा. त्याचे एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याची माहिती पत्नीला मिळाली. त्यानंतर पत्नीने त्याला जाब विचारला. तेव्हा त्याने मोनिकाला मारहाण केली. तिचा शारिरिक आणि मानसिक छळ केला. छळामुळे तिने ११ जून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलीस उपनिरीक्षक रेश्मा साळुंखे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×