Breking News
MLC Election 2026 : विधान परिषदेच्या ५ पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबरला मतदानBaramati Wastewater Reuse : बारामतीत सांडपाण्यावर प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापरPune News : पुण्यात २२ ऑक्टोबरला ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’चे जनजागृती सत्रPune Assault Cases : महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण; कोरेगाव पार्कमधील घटनाPune Post Office : टपाल विभागाच्यावतीने २७ ऑक्टोबरला पेन्शन अदालतीचे आयोजनYerawada Drainage Pit Death Case : येरवड्यात खड्ड्यात पडून ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यूPune Fodder Production Plan : पुणे जिल्ह्यात २५ हजार एकरांवर चारा उत्पादनाचे नियोजनPune Police : पुण्यातील १० गुन्हेगारांना तडीपारीचा दणकाPune Water Scarcity Action Plan : संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी त्रैमासिक कृती आराखडा तातडीने सादर करा – अमित पाथरवटPune Cyber Crime : पेन्शनकार्ड नोंदणीची बतावणी, जेष्ठाला ५ लाखांचा गंडा

Women Farmer Certificate : सेवा संकल्प अभियानांतर्गत महिला शेतकरी प्रमाणपत्र नोंदणीसाठी विशेष उपक्रम

Women Farmer Certificate

तालुका कृषी अधिकारी सचिन हाके यांनी केले मार्गदर्शन

marathinews24.com

बारामती – महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार दि. १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राज्यभर ‘सेवा संकल्प अभियान’ (Women Farmer Certificate) राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ कृषी अधिकारी, सुपे यांच्या कार्यक्षेत्रातील विविध गावांमध्ये महिला शेतकऱ्यांसाठी विशेष प्रमाणपत्र नोंदणी संदर्भात तालुका कृषी अधिकारी सचिन हाके यांनी मार्गदर्शन केले.

गायकाने प्रतिभा घेऊनच जन्माला यावे लागते-आरती अंकलीकर-टिकेकर – सविस्तर बातमी 

महिला शेतकऱ्यांना शासनाच्या विविध कृषी योजना व सुविधांचा लाभ मिळवून देण्यासाठी महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणी व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली. यावेळी पात्र महिला शेतकऱ्यांची माहिती संकलित करून त्यांचे प्रमाणपत्र नोंदणीचे काम करण्यात आले.

Women Farmer Certificate महिला शेतकऱ्यांनी विविध कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेल्या महिला शेतकरी प्रमाणपत्राचे महत्त्व, त्यासाठी आवश्यक कागदपत्रे, नोंदणी प्रक्रिया तसेच प्रमाणपत्राचा विविध शासकीय योजनांमध्ये होणारा उपयोगाबाबत मंडळ कृषी अधिकारी बापूराव लोदाडे यांनी मार्गदर्शन केले.

या उपक्रमाद्वारे महिला शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या योजनांच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना शासकीय योजनांचा लाभ सुलभतेने देण्यासाठी उपयोग होणार आहे. महिला शेतकऱ्यांनीही या विशेष उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद देत प्रमाणपत्र नोंदणी करून घेतली. या वेळी उपस्थित महिला शेतकऱ्यांना शासनाच्या विविध कृषी योजना व डिजिटल कृषी सेवांचीही माहिती देण्यात आली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×