Breking News
MLC Election 2026 : विधान परिषदेच्या ५ पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबरला मतदानBaramati Wastewater Reuse : बारामतीत सांडपाण्यावर प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापरPune News : पुण्यात २२ ऑक्टोबरला ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’चे जनजागृती सत्रPune Assault Cases : महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण; कोरेगाव पार्कमधील घटनाPune Post Office : टपाल विभागाच्यावतीने २७ ऑक्टोबरला पेन्शन अदालतीचे आयोजनYerawada Drainage Pit Death Case : येरवड्यात खड्ड्यात पडून ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यूPune Fodder Production Plan : पुणे जिल्ह्यात २५ हजार एकरांवर चारा उत्पादनाचे नियोजनPune Police : पुण्यातील १० गुन्हेगारांना तडीपारीचा दणकाPune Water Scarcity Action Plan : संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी त्रैमासिक कृती आराखडा तातडीने सादर करा – अमित पाथरवटPune Cyber Crime : पेन्शनकार्ड नोंदणीची बतावणी, जेष्ठाला ५ लाखांचा गंडा

YASHADA Health Camp : सक्षम यशदा उपक्रमांतर्गत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

YASHADA Health Camp

आयुर्वेद, आहार आणि जीवनशैलीबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन

marathinews24.com

पुणे – सक्षम यशदा (YASHADA Health Camp) उपक्रमांतर्गत तसेच आयुर्वेद दिनाचे औचित्य साधून प्रकृति आयुर्वेद पंचकर्म क्लिनिक, औंध, यांच्या वतीने यशदा येथे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात यशदामधील ६० हून अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

सेवा संकल्प अभियानाच्या निमित्ताने माळशेज घाटात ‘रानभाजी महोत्सव’ उत्साहात संपन्न – सविस्तर बातमी 

या आरोग्य शिबिराचे उद्घाटन यशदाचे (YASHADA Health Camp) महासंचालक डॉ. सुहास दिवसे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड, उपमहासंचालक सचिन कलंत्रे, डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी आणि डॉ. हेमंत वसेकर उपस्थित होते.

यावेळी डॉ. समीर भाले आणि डॉ. तेजस्विनी भाले-बोरसे यांनी नाडी परीक्षणासह विविध आरोग्य तपासण्या करून सहभागी अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक औषधांचे वितरण केले. तसेच आहार, दैनंदिन जीवनशैली आणि पंचकर्म याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

YASHADA Health Camp डॉ. तेजस्विनी भाले-बोरसे यांनी ‘आपल्या आरोग्याला प्रथम प्राधान्य का द्यावे?’ या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान दिले. आपल्या २२ वर्षांच्या अनुभवाच्या आधारे त्यांनी जीवनशैलीशी संबंधित आजारांची कारणे, त्यापासून बचाव करण्यासाठी आवश्यक जीवनशैलीतील बदल तसेच प्राचीन भारतीय वैद्यकशास्त्र असलेल्या आयुर्वेदाच्या माध्यमातून आरोग्य संवर्धनाचे उपाय याबाबत माहिती दिली.

आरोग्य शिबिराच्या आयोजनासाठी निबंधक राजीव नंदकर आणि डॉ. राजेंद्र जोशी यांनी मार्गदर्शन केले. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×