Breking News
Pune Crime Branch News : दहशत माजविण्यासाठी पिस्तूल बाळगणारा सराईत गजाआडAmit Shah Pune Visit Traffic Changes : गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर; वाहतूकीत बदलKothrud Newborn Babies Celebration : कोथरुडमधील १ हजारहून अधिक नवजात बालकांचा अनोखा बालदिन सोहळBharat Sasane Pune : मुलांच्या कल्पनाशक्तीला पंख निर्माण करणे महत्त्वाचे-भारत सासणेVishranti Hospital Pune : विश्रांती हॉस्पिटल हे कर्करोग रुग्णांसाठी आशेचा किरण – अ‍ॅडमिरल मनीष होनवाडPune Crime News : पीएमपी प्रवासी महिलेचे दागिने लांबविलेKondhwa Flat Theft Pune : कोंढव्यात ८ फ्लॅटचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्नPune Khadak Police Theft Case : २५ दिवसांत १० हजार किलोमीटरचा प्रवास करून उघडकीस आणला गुन्हाRaghoji Bhangare Freedom Fighter : सह्याद्रीच्या कपारीत गर्जना करणारा आदिवासींचा वाघ: राघोजी भांगरेSugarcane Trash Management : ढेकळवाडी येथे ऊस पाचट व्यवस्थापन कार्यक्रम संपन्न

Yerawada Drainage Pit Death Case : येरवड्यात खड्ड्यात पडून ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

Yerawada Drainage Pit Death Case

जबाबदारांवर कठोर कारवाई करा-डॉ. नीलम गोऱ्हे

marathinews24.com

पुणे – Yerawada Drainage Pit Death Case : शहरातील येरवडा येथील चित्रा चौक परिसरात ड्रेनेजच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून ज्येष्ठ नागरिक श्री. प्रदीप लक्ष्मण परदेशी (वय ६९) यांचा मृत्यू झाल्याप्रकरणी जबाबदारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना नेत्या, विधान परिषद सदस्या तथा माजी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली आहे. या प्रकरणी गृह (शहरे) राज्यमंत्री श्री. योगेश कदम आणि नगरविकास राज्यमंत्री श्रीमती माधुरी मिसाळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांची तातडीची संयुक्त बैठक बोलवावी, अशी मागणीही त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

पुणे जिल्ह्यात २५ हजार एकरांवर चारा उत्पादनाचे नियोजनबात्म – सविस्तर बातमी 

शिवसेनेचे पुणे शहर संघटक आनंद गोयल यांनी दिलेल्या निवेदनानुसार, चित्रा चौक परिसरात पुणे महानगरपालिकेच्या मलनिःसारण विभागामार्फत मागील सहा महिन्यांपासून ड्रेनेजचे काम सुरू आहे. या कामासाठी खोदलेल्या सुमारे १० ते १५ फूट खोल खड्ड्यात दि. १७ ऑक्टोबर रोजी श्री. परदेशी पडले. गंभीर जखमी झाल्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. कामाच्या ठिकाणी मजबूत बॅरिकेड्स, धोक्याचे सूचना फलक, परावर्तक चिन्हे आणि पुरेशी प्रकाशव्यवस्था नव्हती. स्थानिक नागरिकांनी यापूर्वी तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे गोयल यांच्या निवेदनात नमूद आहे.

“सार्वजनिक कामे सुरू असताना नागरिकांच्या जीविताचे रक्षण करणे ही संबंधित यंत्रणा आणि ठेकेदाराची जबाबदारी आहे. या दुर्घटनेची सखोल चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी. मृताच्या कुटुंबीयांना तातडीने आधार मिळावा आणि अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी ठोस उपाययोजना व्हाव्यात,” अशी भूमिका डॉ. गोऱ्हे यांनी मांडली. संबंधित ठेकेदार व अन्य जबाबदार व्यक्तींविरुद्ध लागू कायदेशीर तरतुदींनुसार गुन्हा नोंदविण्याची कार्यवाही करावी. तपासातील पुराव्यांच्या आधारे सदोष मनुष्यवधाच्या तरतुदी लागू होतात का, याचीही पडताळणी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच दोषी ठेकेदारास नियमानुसार काळ्या यादीत टाकावे आणि देखरेखीत हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर विभागीय कारवाई करावी, असेही त्यांनी नमूद केले.

मृत परदेशी यांच्या कुटुंबीयांना तातडीची आर्थिक मदत व नियमानुसार नुकसानभरपाई द्यावी. पुणे शहरातील सर्व सुरू असलेल्या रस्ते खोदकाम आणि ड्रेनेज कामांचे कालबद्ध सुरक्षा परीक्षण करून धोकादायक ठिकाणी तात्काळ उपाययोजना कराव्यात, (Yerawada Drainage Pit Death Case) अशी मागणीही डॉ. गोऱ्हे यांनी केली आहे. प्रस्तावित संयुक्त बैठकीत पोलीस तपासाची प्रगती, ठेकेदार व अधिकाऱ्यांची जबाबदारी, कुटुंबीयांना मदत आणि खोदकामांच्या ठिकाणची सुरक्षा व्यवस्था यांचा आढावा घ्यावा. या बैठकीस महापालिका व पोलीस प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी, संबंधित पुणे मनपा विभागप्रमुख, आनंद गोयल आणि मृताच्या कुटुंबीयांच्या प्रतिनिधींना निमंत्रित करावे. प्राथमिक कार्यवाहीचा अहवाल तीन दिवसांत उपलब्ध करून देण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×