Breking News
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त वाहतुकीत बदलसाहित्यरत्न लोकशातिर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीच्या पूर्वसध्येला समाजरत्न पुरस्कार समारंभपुण्यात १२ हजार ७५० विद्यार्थ्यांना मिळणार ‘अंकनाद गणित सात्मीकरण प्रणालीबालमैत्रीपूर्ण आश्रमशाळा उपक्रम आदिवासी मुलांसाठी संरक्षणात्मक वातावरण करण्यास उपयुक्त-प्रदीप देसाईखराडी पार्टी प्रकरणात पोलिसांची कारवाई एकतर्फीछत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना; यवतमध्ये ३१ जुलैला रस्ता रोकोॠषिकेश ते रामेश्वरम गौ राष्ट्र यात्रेचे पुण्यात उत्साहात स्वागतसैनिक व त्यांच्या कुटुंबांच्या सन्मानासाठी विधी सेवा चिकित्सालय केंद्राचे ठोस पाऊल – आयुक्त पुलकुंडवारजिल्ह्यातील वनपर्यटनात मोठ्या क्षमता; पर्यावरणपूरक पद्धतीने पर्यटकांसाठी सुविधा निर्माण कराव्यातलायन्स क्लब पूना शिवाजीनगरच्या अध्यक्षपदी डॉ. गणेश खामगळ यांची निवड

पुण्यात मेफेड्रॉनचे रॅकेट चालविणार्‍या आक्काला बेड्या

पुण्यात मेफेड्रॉनचे रॅकेट चालविणार्‍या आक्काला बेड्या

बुधवार पेठेत वेश्या व्यवसायाच्या आडून करीत होती तस्करी

marathinews24.com

पुणे – शहरातील मध्यवर्ती बुधवार पेठेत वेश्या व्यवसायाच्या आडून ग्राहकांना मेफेड्रॉनची तस्करीचे रॅकेट चालविणार्‍या आक्काला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथक दोनने अटक केली आहे. बुधवार पेठेतील बहुतांश परिसरातील महिलांसह ग्राहकांना मागील दोन वर्षांपासून ती एमडीची विक्री करीत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. तिला कात्रज परिसरातून ताब्यात घेत अटक केली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांनी दिली आहे. ज्योती सुनील यादव उर्फ कट्टीमणी (वय ५० रा. कात्रज पुणे) असे अटक केलेल्या आक्काचे नाव आहे.

पालखी सोहळ्यात ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर करणार – सविस्तर बातमी 

मेफेड्रॉन तस्करीसाठी आलेल्या एकाला अमली पदार्थ विरोधी पथक दोनने नुकतेच अटक केले होते. त्याच्याकडून १२ लाख १२ हजार रूपये किंमतीचे ६० ग्रॅम मेफेड्रॉन जप्त केले होते. चौकशीदरम्यान त्याने आरोपी ज्योती कटिमणीकडून मेफेड्रॉन घेतल्याचे स्पष्ट झाले. पथकाने कात्रज परिसरातून तिला ताब्यात घेत अटक केली. आरोपी ज्योती ही बुधवार पेठेत कुंटणखाना चालवित असून, तिने विविध ग्राहकांच्या माध्यमातून एमडी विक्रीचे रॅकेट चालविल्याचे स्पष्ट झाले आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर आयुक्त पंकज देशमुख, पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, एपीआय नितीनकुमार नाईक, उपनिरीक्षक अस्मिता लाड, चेतन गायकवाड, मयुर सुर्यवंशी, साहिल शेख, उदय राक्षे, संदिप शेळके, अझिम शेख, योगेश मांढरे, युवराज कांबळे, आझाद पाटील, निलम पाटील, दिशा खेवलकर, रविंद्र रोकडे यांनी केली आहे.

सेक्स वाढीसाठी एमडीचा वापर

मेफेड्रॉन विक्रीतून कमी वेळेत जास्त पैसा मिळत असल्यामुळे आरोपी ज्योतीने काही महिन्यांपासून एमडी विक्रीला सुरूवात केली. बुधवार पेठेत वेश्या गमनासाठी आलेल्या ग्राहकाला अमली पदार्थाची विक्री करीत रॅकेट चालवित होती. एमडीचे सेवन केल्यामुळे सेक्स वाढण्यात फायदा होत असल्यामुळे ग्राहकांकडूनही अमली पदार्थाची मागणी होती. वेश्या व्यवसायाच्या आडून तिने एमडी विक्रीचेही रॅकेट चालविले होते. मात्र, यापक्ररणी तिचा भाउ शरणप्पा नागाप्पा कटिमणी (वय ३४ रा. आप्पा दुगड शाळेजवळ, कात्रज, पुणे. मुळ रा. मु. पो. भापंर गल्ली, जि. गुलबर्गा, कर्नाटक) याला अटक केली. चौकशीत त्याने ज्योताकडून ड्रग्ज विकत घेतल्याची कबुली दिली.

शहरातील मध्यवर्ती बुधवार पेठेत एमडी ड्रग्जची विक्री करणार्‍या आक्काला अटक केली आहे. प्राथमिक तपासानुसार दोन वर्षांत तिने अनेक महिलांसह ग्राहकांना ड्रग्ज विकले आहे. दरम्यान, तिच्याकडे ड्रग्जचा पुरवठा करणार्‍याचा शोध घेतला जात आहे. सुदर्शन गायकवाड, पोलीस निरीक्षक, अमली पदार्थ विरोधी पथक दोन

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top