Breking News
मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे- साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेसेवेचा शुभारंभकल्याण रेल्वे यार्ड सुरक्षेसाठी अधिवेशनात उच्चस्तरीय बैठक‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावेखरीप पिकांसाठी रुंद सरी-वरंबा (BBF) पद्धतीने पेरणी करण्याचे आवाहनशिवाजीनगरमधील हाॅटेलमध्ये देहविक्रय

सुट्टीला गावी चाललाय, पण घरांच्या सुरक्षिततेचे काय ?

उन्हाळी सुटीच्या आनंदात नागरिकांमध्ये धास्ती

marathinews24.com

पुणे – मुलांच्या शालेय परिक्षा संपल्यामुळे उन्हाळ्यानिमित्त अनेकांकडून सहकुटूंब बाहेरगावी जाण्यास प्राधान्य दिले जाते. मात्र, गावी जाण्याआधी घरातील मौल्यवान दागिन्यांसह ऐवजांची खबरदारी घेणे आवश्यक आहे. विशेषतः घरातकिंमती ऐवज, रोकड, सोन्या-चांदीचे दागिने न ठेवता सुरक्षित ठिकाणी ठेवणे महत्वाचे आहे. कारण, तुमच्या सुटीची संधी साधून चोरट्यांकडून सोसायट्यांसह फ्लॅटमध्ये घरफोडी करीत ऐवज लुटून नेला जाण्याची शक्यता आहे. त्यापार्श्वभूमीवर नागरिकांनो, मूळगावी जात असल्यास खबरदारी घेउन शेजारच्यांना माहिती द्यावी. सुरक्षारक्षक, सोसायटीचे अध्यक्षानाही सूचित करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

नसरापूर प्रकरणी बाल हक्क संरक्षण आयोगाची गंभीर दखल – सविस्तर बातमी

शहरात नोकरी, व्यवसाय, शिक्षण घेण्यासाठी बाहेरगावाहून आलेल्या चाकरमान्यांची संख्या मोठी आहे. विविध सण उत्सवासह प्रामुख्याने उन्हाळ्यात मुलांच्या शालेय सुटीमुळे अनेकजण मूळगावी जाण्यास उत्सुक असतात. मात्र, नेमकी तीच संधी साधून चोरट्यांकडून घरफोडी केल्याचे मागील काही वर्षांत दिसून आले आहे. त्यापार्श्वभूमीवर नागरिकांनी घराच्या सुरक्षिततेची काळजी घेणे गरजेचे आहे. आपल्या घरांसह फ्लॅटची काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. सुटीमुळे अनेकांकडून गावी जाण्याबरोबरच पर्यटन करण्यास प्राधान्य दिले जाते. या काळात महिलांकडून दागिने परिधान करण्यावर भर दिला जातो. त्याचीही काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

एसटी, रेल्वेसह खासगी वाहनांतून केलेल्या प्रवासात मौल्यवान वस्तू, दागिने गहाळ किंवा चोरीला होण्याच्या भीतीने अनेकांकडून वस्तू लॉकरमध्ये ठेवल्या जातात. मात्र, बंद घरांचे कुलूप फोडून चोरटे ऐवज लंपास करतात. त्यामुळे परगावी जाताना नागरिकांनी घरांच्या सुरक्षिततेची खबरदारी घ्यावी. कारण मागील वर्षी उन्हाळ्यात शहरातील विविध भागांत घरफोडीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे सुटी निमित्ताने बाहेरगावी जाताना नागरिकांनी शेजारच्यांना माहिती देणे, सोसायटीचा सुरक्षारक्षकांना गावी जात असल्याचे सांगणे महत्वाचे आहे. त्यामुळे संभाव्य घरफोडीच्या घटना टाळता येणार आहेत. त्यासोबतच प्रवासादरम्यानही ऐवजाची काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

व्हॉट्सअप स्टेटस अन चोरीच्या घटना

सुटीनिमित्त अनेकांकडून पर्यटनाचे फोटो व्हॉट्सअ‍ॅप स्टेटससह फेसबुकवर अपलोड केले जातात. त्यामुळे संबंधित कुटूंबियाची माहिती सोशल मीडियावर व्हायरल होते. नेमकी संधी साधून चोरट्यांकडून घरफोडी केली जात असल्याचे काही घटनांवरून स्पष्ट झाले आहे. दरम्यान, चोरट्यांनी फेसबुकवरील फोटो, व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस पाहून घरफोडी केल्याची नोंद पोलीस ठाण्यात आहे. त्यामुळे गावी जाताना अथवा पर्यटनाला गेल्यानंतर व्हॉटसअ‍ॅप स्टेटसद्वारे लोकेशनचा दिखावा टाळल्यास चोरीसारख्या घटनांना आळा बसणार आहे.

सोने, रोकड, मौल्यवान दागिने सुरक्षितरित्या ठेवा

मूळगावी जाणार्‍या नागरिकांनी घरातील सोने, रोकड, मौल्यवान दागिने सुरक्षितरित्या ठेवावे. त्याशिवाय सुरक्षारक्षक, शेजार्‍यांना गावी चालल्याची माहिती द्यावी. संभाव्य घरफोडीच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत वरिष्ठ अधिकार्‍यांना सुरक्षितेबाबत सुचित केले आहे. त्याशिवाय पेट्रोलिंग वाढविण्यावर भर देण्यात आला आहे. पोलिसांसोबत नागरिकांनीही आपआपल्या मालमत्तेचे रक्षण करणे आवश्यक आहे. त्यामुळे चोरीसह इतर घटना कमी घडण्यास मदत होणार आहे.

गावी जाताय, तर हे कराच

घरात सोने, रोकड ठेवू नका

सोसायटीच्या सुरक्षा रक्षकांना माहिती द्यावी

घराला लोखंडी जाळीचा सेफ्टी दरवाजा गरजेचा

सीसीटीव्ही कार्यन्वित असल्याची खात्री करावी

रात्रीच्या वेळी घरातील आणि बाहेरील लाईट सुरू ठेवावी.

संशयित व्यक्तींची माहिती पोलिसांना द्यावी

शेजारी गावी जाणार नसल्यास त्यांना माहिती द्यावी

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×