Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

छतावर तरुणाचा मृतदेह सापडला, खूनाचा संशय

पुण्यात तिकिट विक्री केंद्रात रेल्वे कर्मचाऱ्यावर चाकूने वार; रोकड लुटली

लष्कर भागातील छत्रपती शिवाजी मार्केटमधील घटना 

marathinews24.com

पुणे – छतावर तरुणाचा मृतदेह सापडला, खूनाचा संशय – छतावर तरुणाचा मृतदेह सापडल्याची घटना रविवारी सायंकाळी लष्कर भागातील छत्रपती शिवाजी मार्केटमध्ये उघडकीस आली. तरुणाच्या गळा आवण्यात आल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात दाखल केला. शवविच्छेदन अहवालात तरुणाच्या मृत्यूमागचे कारण स्पष्ट होईल, अशी माहिती लष्कर पोलिसांनी दिली. दाऊद उर्फ शाकीर शेख असे मृतावस्थेत सापडलेल्या तरुणाचे नाव आहे.

भोंग्याविरोधात किरीट सोमय्या यांच्याकडून कारवाईची मागणी – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्कर भागात छत्रपती शिवाजी मार्केट असून, बाजाराची जबाबदारी पुणे कटक मंडळ सांभाळते. गणपती मंदिराशेजारीच कटक मंडळाची खोली (स्टोअर रुम) आहे. खोलीच्या छतावर दाऊदचा मृतदेह रविवारी दुपारी आढळून आला. दाऊद हा मटण विक्री दुकानात कामाला होता. तो त्याच्या पत्नीसह येरवड्यातील नागपूर चाळ येथे राहायला आहे. रविवारी दुपारी परिसरात दुर्गंधी पसरल्याची तक्रार रहिवाशांनी पोलिसांकडे केली. पोलिसांनी पाहणी केली. तेव्हा छतावर दाऊदचा मृतदेह आढळून आला असून, त्याच्या गळ्यावर आवळ्याचे व्रण आहेत. याप्रकरणी लष्कर पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली आहे. लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश दिघावकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे.

ड्रग्जचे व्यसन करणार्‍यांचा वावर

अमली पदार्थ व्यसन करणार्‍यांचा छत्रपती शिवाजी मार्वेâट परिसरात वावर आहे. त्यामुळे परिसरात किरकोळ कारणावरुन त्यांच्यात हाणामारीच्या घटना घडतात. अरुंद गल्ल्यांमध्ये खरेदीसाठी आलेल्या महिलांच्या पिशवीतून ऐवज चोरून नेला आहे. हाकेच्या अंतरावर पोलीस चौकी असूनही कारवाई केली जात नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. परिसरात फिरणारे चोरटे, अमली पदार्थांचे व्यसन करणार्‍यांविरुद्ध पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

सोसायटीच्या आवारातील झाड तोडताना मजुर ठार; बाणेरमध्ये ठेकेदारासह पदाधिकार्‍यांविरुद्ध गुन्हा

पुणे- सोसायटीच्या आवारातील झाडाच्या फांद्या तोडताना तोल जाऊन पडल्याने मजुराचा मृत्यू झाल्याची घटना २७ जुलैला बाणेरमध्ये घडली. मजुराला सुरक्षाविषयक साधने न पुरविता दुर्घटनेस जबाबदार ठरल्याप्रकरणी ठेकेदारासह सोसायटीतील पदाधिकार्‍यांविरुद्ध बाणेर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला. लहू गुलाब क्षीरसागर (वय ६६, रा. इंगवले चौक, पिंपळे निलख) असे मृत्युमुखी पडलेल्या मजुराचे नाव आहे. अमोल क्षीरसागर (वय ३४) यांनी बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाणेर भागातील ऋतुरंग पार्क सोसायटीच्या आवारात झाडाच्या फांद्या वाढल्या होत्या. फांद्या तोडण्याचे काम सोसायटीतील पदाधिकार्‍यांनी ठेकेदाराकडे दिले होते. २७ जुलैला दुपारी साडेचारच्या सुमारास लहू क्षीरसागर हे झाडावर चढले. फांद्या तोडत असताना त्यांचा तोल जाऊन कोसळले. क्षीरसागर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ठेकेदार, तसेच सोसायटीतील पदाधिकार्‍यांनी झाडाच्या फांद्या तोडताना पुरेशी सुरक्षाविषयक साधने पुरविली नाहीत. बेजबाबदारपणामुळे ही दुर्घटना घडली, असे फिर्यादीत म्हटले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी घटनास्थळी भेट दिली. सहायक पोलीस निरीक्षक थिटे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×