Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

पुण्यात बोअरवेलमुळे मेट्रो मार्गेकेवर पाणी गळती

शंकरशेठ रोडवर मेफेड्रॉनसह आरोपी जेरबंद

घरमालकासह ठेकेदारावर गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – घराच्या जागे खालून भूमिगत मेट्रो गेलेली माहीत असताना देखील बोअरवेल घेतल्याने, बोगद्याच्या मास्काला खड्डा पडून मेट्रो मार्गेकेवर पाणीगळती झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी खडक पोलिसांनी घरमालक धनंजय मोटे आणि ठेकेदार जगताप याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुणे मेट्रोचे संयुक्त महाव्यवस्थापक (सिव्हील) शंतनु गोरात्रा यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार १४ मार्च रोजी दुपारी पावने एक वाजताच्या सुमारास खडक पोलिस ठाण्यासमोर शुक्रवार पेठ घर क्रमांक ४१५ येथे घडला आहे.

तृतीयपंथी नागरिकांसाठी स्वयंरोजगाराला चालना – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोटे यांना घराच्या जागेच्या खालून भूमिगत मेट्रो गेली आहे हे माहिती आहे. मात्र तरी देखील त्यांनी जाणीवपुर्वक निष्काळजीपनाने बोअरवेलचे काम केले. त्यामुळे भूमिगत बोगद्याच्या मास्कला सहा इंचाचा खड्डा पडला. खड्ड्यामुळे मेट्रो मार्गेकेवर पाणीगळती झाली. मोटे यांनी लोकांच्या जीवातास व व्यक्तीगत सुरक्षितेस धोका निर्माण होणारे कृत्य केले. तसेच केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या संयुक्त निधी प्रकल्पातून महामेट्रोच्या मालमत्तेचे मुल्य किंवा उपयुक्तता नष्ट होईल किंवा कमी होईल अशा प्रकारचे कृत्य करून, मेट्रोच्या मालमत्तचे अडीच लाख रुपयांचे नुकसान केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

बोअरवेलमुळे मेट्रोमार्गेकेत पाणी गळती झाल्याचे निदर्शनास येताच मेट्रोच्या वतीने खडक पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांनी हा गुन्हा दाखल केल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी यांनी सांगितले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×