Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

तृतीयपंथी नागरिकांसाठी स्वयंरोजगाराला चालना

बीज भांडवल योजना; अर्ज करण्याचे आवाहन

marathinews24.com

पुणे – राज्यातील तृतीयपंथी नागरिकांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी तसेच त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाने स्वयंरोजगार व व्यवसायासाठी बीज भांडवल योजना राबविण्यास मान्यता दिली आहे. या योजनेमुळे तृतीयपंथीयांना आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक उन्नतीची संधी उपलब्ध होणार आहे. यासाठी विहित नमुन्यातील अर्ज करण्याचे आवाहन सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे.

पुणे जिल्ह्यातील युवक-युवतींसाठी अल्प मुदतीच्या प्रशिक्षणाची सुवर्णसंधी – सविस्तर बातमी

तृतीयपंथी घटकांच्या विविध समस्यांचा विचार करून शासन निर्णय दि. १३ डिसेंबर २०१८ अन्वये राज्य, प्रादेशिक व जिल्हास्तरावर तृतीयपंथी संरक्षण व कल्याण मंडळ स्थापन करण्यात आले आहे. तसेच दि. ७ ऑक्टोबर २०२० पासून जिल्हास्तरावर तक्रार निवारण समित्याही कार्यरत आहेत. यानंतर मंत्रिमंडळाच्या मान्यतेने दि. ११ मार्च २०२४ रोजी तृतीयपंथीयांसाठी सर्वंकष धोरण जाहीर करण्यात आले असून विविध विभागांच्या योजना पात्र लाभार्थ्यांना लागू करण्यात आल्या आहेत.

राज्यातील किमान १० वर्षे वास्तव्य असलेल्या तृतीय पंथीयांना स्वयं रोजगारासाठी प्रोत्साहन देण्यासाठी बीज भांडवल योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या कौशल्याचा विकास करून त्यांना शाश्वत रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. राष्ट्रीयकृत बँकांमार्फत लघु व्यवसायांसाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार असून, जिल्हास्तरीय समितीच्या मान्यतेनंतर सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्या शिफारशीनुसार बँकांकडे कर्ज प्रस्ताव पाठविण्यात येईल. कर्ज मंजुरीनंतर शासन अनुदानासाठी प्रस्ताव आयुक्त, समाज कल्याण, पुणे यांच्या मार्फत शासनाकडे सादर करण्यात येतील.

या योजनेअंतर्गत कर्जाचे तीन प्रकार निश्चित करण्यात आले आहेत. लघु कर्ज योजना अंतर्गत २५ हजार रुपये, मध्यम कर्ज योजना अंतर्गत ५० हजार रुपये आणि दीर्घ कर्ज योजना अंतर्गत २ लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध होणार आहे. प्रत्येक लाभार्थ्यास यापैकी एकच कर्ज मंजूर केले जाईल. यामध्ये लाभार्थ्यांचा हिस्सा ५ टक्के, शासन अनुदान ४५ टक्के आणि ५० टक्के कर्ज राष्ट्रीयकृत बँकेमार्फत दिले जाईल. तसेच कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या लाभार्थ्यांना व्याजदरावर ३ टक्के सूटही देण्यात येणार आहे.

तृतीयपंथीय लाभार्थ्यांनी शासनाने निर्धारित केलेल्या नमुन्यातील अर्ज व आवश्यक कागदपत्रांसह परिपूर्ण प्रस्ताव सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, पुणे या कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×