Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

जेष्ठाला जादा परताव्याचे आमिष पडले १ कोटींना

तरुणाला शेअर मार्केटमधील गुंतवणूक पडली १७ लाखांना

सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – शेअर मार्केटमध्ये जास्त परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका ज्येष्ठ नागरिकाची १ कोटी तीन लाख ५० हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास सुरू आहे.

बिटकॉइन गुंतवणुकीच्या आमिषाने ११ लाख ४८ हजारांची फसवणूक – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार २८ नोव्हेंबर २०२५ ते १६ डिसेंबर २०२५ या कालावधीत घडला. याबाबत कोंढवा एनआयबीएम रस्त्यावरील ६३ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर चोरट्यांनी तक्रारदार महिलेला युट्युब चॅनलवरील व्हिडिओच्या माध्यमातून तक्रारदाराशी संपर्क साधला. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळेल, असा विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर आरोपींनी लिंक पाठवून संबंधित ॲप डाउनलोड करण्यास भाग पाडले. या ॲपच्या माध्यमातून वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे भरण्यास सांगण्यात आले. अधिक नफ्याच्या आशेने तक्रारदाराने टप्प्याटप्प्याने रक्कम जमा केली. मात्र, नंतर हा प्रकार फसवणुकीचा असल्याचे लक्षात आले. या प्रकरणातील आरोपींची ओळख अद्याप पटलेली नसून, सायबर पोलिसांकडून तपास सुरू आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×