Breking News
हडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्नजणगणना करण्यासाठी गेलेल्या महिला कर्मचाऱ्याचा विनयभंगहसण्यातूनच वाढेल माणसाचा ‘हॅप्पीनेस इंडेक्स’ – मकरंद टिल्लूतपास होणार नसेल तर कार्यालयाला कुलूप लावा -आमदार रोहित पवार

बिटकॉइन गुंतवणुकीच्या आमिषाने ११ लाख ४८ हजारांची फसवणूक

बिटकॉइन गुंतवणुकीच्या आमिषाने ११ लाख ४८ हजारांची फसवणूक

बिटकॉइनमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळेल असे आमिष दाखवून फसवणूक

marathinews24.com

पुणे – अधिक परताव्याचे आमिष दाखवत बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडून महिलेची ११ लाखांहून अधिक रकमेची ऑनलाइन फसवणूक केल्याचा प्रकार कोंढवा परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

फलक लावण्याच्या वादातून गोळीबाराचा प्रयत्न – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार २३ मार्च २०२४ ते २८ मार्च २०२४ या कालावधीत घडला. याबाबत कोंढवा बुद्रुक येथील ४४ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी टेलीग्राम ग्रुपच्या माध्यमातून तक्रारदाराशी संपर्क साधला. बिटकॉइनमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळेल, असे आमिष दाखवले. त्यानंतर आरोपींनी तक्रारदाराकडून वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे जमा करून घेण्यात आले. काही दिवसांनी अपेक्षित परतावा न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले. या प्रकारात एकूण ११ लाख ४८ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.

शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने १५ लाखांची फसवणूक

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक व व्यवसायाच्या नावाखाली विश्वास संपादन करून १५ लाखांहून अधिक रक्कम उकळल्याचा प्रकार येरवडा परिसरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास सुरू आहे. ही घटना १३ सप्टेंबर २०२५ ते २५ मार्च २०२६ या कालावधीत कल्याणीनगर येथील ग्राफिकॉन कोर्ट परिसरात घडली. याबाबत कल्याणीनगर येथील ४२ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बंटी उर्फ किरण महाडीक (रा. दादर, मुंबई) आणि राजश्री चिखले यांनी संगनमत करून तक्रारदाराचा विश्वास संपादन केला. शेअर मार्केट ट्रेडिंग व व्यवसायासाठी ‘स्टॅम्प ड्युटी’ भरण्याचे आमिष दाखवत त्यांनी वेळोवेळी पैसे मागितले. तक्रारदाराने आरोपींच्या सांगण्यावरून विविध बँक खात्यांमध्ये रक्कम जमा केली. मात्र, अपेक्षित परतावा न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×