Breking News
Marathi Subtitles : समान भाषा उपशीर्षकांमुळे भाषा शिक्षणाला गती -प्रधान सचिव ब्रिजेश सिंहPune Crime : पुण्यातील लक्ष्मी रस्ता, विमाननगरला लुटीची घटनाKharadi News : ड्रग्जच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी; तरुणाची आत्महत्याPune Crime News : पुण्यात वेगवेगळ्या भागात दोघांना लुटलेतडीपार केलेल्या तीन महिला ताब्यात; तडीपार आदेशाचा भंग केल्याचे उघडWomen Scientists Felicitation Pune : श्री महालक्ष्मी मंदिरातर्फे महिला शास्त्रज्ञांचा सन्मानMaharashtra Drought Relief Measures 2026 : बंद पाणीपुरवठा योजना तातडीने सुरू करा; टँकरचा पर्याय शेवटी वापरा–महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेAnubandh Support Group Pune : एकटेपणावर मात करण्यासाठी अनुबंधसारखे आधारगट हवे- विजया रहाटकरDagdusheth Ganpati Trust : ‘दगडूशेठ’ गणपती ट्र्स्ट तर्फे ५०० ज्येष्ठांना मोफत श्रवणयंत्रPolice Constable Suspension : इन्स्टाग्रामवरील बातमीवर आक्षेपार्ह टिप्पणी भोवली

फलक लावण्याच्या वादातून गोळीबाराचा प्रयत्न

शिवीगाळ केल्याने झाडल्या गोळ्या, जीम मालक जखमी

गंज पेठेतील घटना

marathinews24.com

पुणे – शहरातील महात्मा फुले पेठेत (गंज पेठ) श्री हनुमान जन्मोत्सवाचा फलक लावण्याच्या वादातून टोळक्याने तरुणाला मारहाण करुन त्याच्यावर पिस्तुलातून गोळीबार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी आठ जणांना अटक केली. स्वप्नील सुनील पाटणकर (वय २२, रा. महात्मा फुले स्मारकाजवळ, महात्मा फुले पेठ) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. पाटणकर याने याबाबत खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी अनिश धडे, ओम लोंढे, सुलतान सय्यद, चैतन्य उर्फ सार्थक शिवपावय, मितेश विनोद माने, सार्थक गावडे, वरद महेंद्र कांबळे, महेंद्र उर्फ वास्को रामचंद्र कांबळे यांना अटक करण्यात आली.

बिबवेवाडीत चारित्र्याच्या संशयावरुन महिलेचा खून – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (२५ मार्च) मध्यरात्री एकच्या सुमारास पाटणकर आणि त्याचा मित्र महात्मा फुले पेठ परिसरात श्री हनुमान जन्मोत्सवाचे फलक लावत होते. त्या वेळी आरोपींशी पाटणकर आणि त्याचा मित्राचा वाद झाला. आरोपी सुलतान सय्यद याने त्याच्याकडील पिस्तूल काढले. पाटणकरवर पिस्तूल रोखून त्याने चाप ओढला. मात्र, पिस्तुलातून गोळी सुटली नाही. पाटणकर याच्याबोबर असलेले मित्र आदित्य, अथर्व आणि आदेश यांना पट्ट्याने मारहाण केले. पाटणकर याच्या डोक्यात पिस्तुलाचा दस्ता मारल्याने तो जखमी झाले.

आरोपींनी पाटणकर आणि त्याच्याबरोबर असलेल्या मित्रांना दगड, तसेच बाटल्या फेकून मारल्या. या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेतली. पसार झालेल्या आरोपींना पोलिसांनी अटक केली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कुरुनुर तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×