Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

क्रिप्टो करन्सीचे आमिष पडले ३० लाखांना

जेष्ठाला क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूकीचे आमिष महागात

सायबर चोरट्याकडून तरूणाला गंडा

marathinews24.com

पुणे – सायबर चोरट्यांनी नागरिकांना अक्षरशः कोडींत पकडले असून, विविध प्रकारचे आमिष दाखवून ऑनलाईनरित्या गंडा घातला जात आहे. सातत्याने घडणार्‍या घटना, तरूण-तरूणींसह महिलांना टारगेट करून सायबर चोरटे ऑनलाईनरित्या संपर्क साधून विश्वास संपादित करीत आहेत. त्यानंतर गुंतवणूकीच्या आमिषाने, गिफ्टची बतावणी, शेअर मार्केटचे जाळे, फसवणूक, फ्रॉड कॉलद्वारे लाखोंचा गंडा घातला जात आहे.

प्रेमप्रकरणातून तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त करणारा अटकेत – सविस्तर बातमी

शेअर ट्रेडींग क्रिप्टो करन्सीमध्ये सुरवातीला सायबर चोरट्यांनी नफा देउन तरूणाचा विश्वास संपादित केला. त्यानंतर त्याला दुसर्‍या ठिकाणी गुंतवणूकीला भाग पाडून तब्बल ३० लाख ५१ हजारांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना ११ एप्रिल ते ७ मे २०२५ कालावधीत कोंढव्यात घडली आहे. याप्रकरणी ३३ वर्षीय तरूणाने कोेंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारक, बँकखातेधारकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरूण कोंढव्यात राहायला असून, ११ एप्रिल २०२५ रोजी सायबर चोरट्यांनी तक्रारदार तरुणाचा संपर्क साधला. त्याच्यासोबत संवाद साधून विश्वास संपादित करीत शेअर मार्वेâटमधील क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले. त्यावर काही प्रमाणात नफा मिळवून दिल्यानंतर सायबर चोरट्यांनी तरूणाला ३० लाख ५१ हजार रूपये गुंतवणूकीला भाग पाडून फसवणूक केली आहे. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार घाडगे तपास करीत आहेत.

क्रेडीट कार्डसाठी गमावले साडेपाच लाख रुपये

स्टेट बँक ऑफ इंडियातून बोलत असल्याची बतावणी करीत सायबर चोरट्यांनी एकाला क्रेडीट कार्ड देण्याचा बहाणा केला. त्यानंतर त्यांच्या व्हॉटसअ‍ॅपवर एपीके फाईल पाठवून मोबाइलचा ताबा मिळवून ऑनलाईनरित्या ५ लाख ४९ हजारांचा गंडा घातला आहे. ही घटना २ ते ३ सप्टेंबर २०२५ कालावधीत कोथरूडमध्ये घडली आहे. याप्रकरणी ४६ वर्षीय नागरिकाने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे कोथरूडमध्ये राहयला असून, २ सप्टेंबर २०२५ रोजी सायबर चोरट्यांनी त्यांच्या वडिलांसोबत संपर्क साधला. स्टेट बँक ऑफ इंडियातून बोलत असल्याची बतावणी करीत क्रेडीट कार्ड देण्याचा बहाणा केला. त्यानंतर सायबर चोरट्याने संबंधिताच्या व्हॉटसअ‍ॅपवर एपीके फाईल पाठवून मोबाइलचा ताबा मिळवला. त्यांच्या बँक खात्यातून ५ लाख ४९ हजार रूपये ऑनलाईनरित्या वर्ग करून घेत फसवणूक केली आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक अनिल माने तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×