Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

प्रेमप्रकरणातून तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त करणारा अटकेत

डाॅक्टरांकडे खंडणी मागणारा गुंड गजाआड

खराडी पोलिसांनी केली अटक

marathinews24.com

पुणे – प्रेम प्रकरणातून उच्चशिक्षित तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या एकाला खराडी पोलिसांनी अटक केली. तरुणीने मुंढवा पुलावरुन नदीपात्रात उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली होती. चैतन्य संजय कानडे (वय २३, रा. वडगाव शेरी ) याला अटक करण्यात आली. याबाबत तरुणीचा भाऊ निखील चारुदत्त अष्टेकर (वय २२) याने खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पुण्यातील कसबा पेठेत घरफोडी करणारे चोरटे गजाआड – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निखील याची बहीण निकिता (वय २३, सध्या रा. सिद्धीविनायक पीजी, झेन्सार आयटी पार्कसमोर, खराडी, मूळ रा. सन्मतीनगर, वैराग रस्ता, ता. माढा, जि. सोलापूर) हिने ६ मे रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास मुंढव्यातील पुलावरुन मुळा-मुठा नदीपात्रात उडी मारुन आत्महत्या केली होती. याप्रकरणी सुरुवातीला पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली होती. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला. निकिताच्या भावाने पोलिसांकडे तक्रार दिली.

निकिता एका माहिती तंत्रज्ञान कंपनीच्या कार्यालयात होती. ती उच्चशिक्षित होती. आरोपी चैतन्य त्यांचा नातेवाईक आहे. चैतन्यचे वडगाव शेरी परिसरात पादत्राणांचे दुकान आहे. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्णाण झाले. त्यानंतर त्याने तिला त्रास देण्यास सुरुवात केली. चैतन्यच्या त्रासामुळे बहिण निकिताने नदीपात्रात उडी मारुन आत्महत्या केली, असे तिचा भाऊ निखील याने फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक माधुरी बिडवे या प्रकरणाचा तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×