Breking News
केसांचा टोप लाउन घरफोड्या, सराईत टोळीचा पर्दाफाशविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात ९३ टक्के अर्जांचे डिजिटायझेशन पूर्णपोलीस असल्याची बतावणी, जेष्ठेचे २ लाखांचे दागिने चोरलेआंबेडकराईट स्टुडंट असोसिएशनची समाजकल्याण आयुक्तांसोबत चर्चापुण्यात तिरंगा रॅली निमित्त वाहतुकीत बदलतंत्रज्ञानाच्या माध्यमातून २४x७ जनतेशी जोडले जाणे ही काळाची गरज – मुरलीधर मोहोळवकील महिलेची ७० लाखांची फसवणूककंपनीच्या नावे बनावट ‘ग्रुप’ करुन ४० लाखांची फसवणूकहडपसरमध्ये मोटारीच्या धडकेत पादचारी ज्येष्ठाचा मृत्यूरविवार पेठेत खरेदी करणाऱ्या महिलेचे दागिने चोरीला

पुण्यात सराईतांकडून ३ पिस्तूलांसह काडतुसे जप्त

युनीट दोनची कामगिरी

marathinews24.com

पुणे – शस्त्रसाठा बाळगणार्‍या दोघा सराईतांना गुन्हे शाखेच्या युनीट दोनने अटक केली आहे. त्यांच्याकडून ३ पिस्तूल, ५ काडतुसे असा १ लाख २१ हजारांचे शस्त्र जप्त केले आहेत. प्रथमेश पंकज देसाई (वय २१, नर्‍हे, आंबेगाव) अनिकेत आंनद केंद्रे (वय २७ सिंहगड रोड वडगांव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. गुन्हे शाखेच्या युनीट दोन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार शिवानंद कायगुडे व उज्वल मोकाशी यांना वडगाव पठार परिसरात दोघा संशयितांची माहिती मिळाली.

पुण्यात पीएमपीएल बसमध्ये चोरट्यांची टोळी सक्रिय – सविस्तर बातमी

सराईतांकडे पिस्तूलांसह काडतुसे असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार पोलीस निरीक्षक अजित जाधव यांनी आरोपींना ताब्यात घेण्याचे आदेश दिले. पथकाने प्रथमेश देसाई आणि अनिकेत केंद्रे यांना ताब्यात घेतले.त्यांच्याकडून ३ पिस्तूल, ५ काडतुसे मिळुन आली. ही कामगिरी उपायुक्त गौहर हसन, एसीपी शैलेश संखे उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी, शंकर नेवसे, नागनाथ राख, सर्जेराव सरगर, संतोष टकले, विजयकुमार पवार, ओमकार कुंभार, शंकर कुंभार, सददाम तांबोळी, अजीम शेख, विनोद चव्हाण, योगेश मांढरे संजय आबनावे, विशाल दळवी, संदिप शिर्के, ऋषिकेश व्यवहारे, साधना ताम्हाणे, विदया शिंदे यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×