बसप्रवासात २ लाखांची सोन्याची चैन लंपास
marathinews24.com
पुणे – पीएमपीएल बसप्रवासात चोरट्यांची टोळी पुन्हा सक्रिय झाली असून, मागील काही दिवसांपासून जेष्ठ महिलांसह गावाहून आलेल्या प्रवाशांना लक्ष्य करीत लुट केली जात आहे. मात्र, याकडे पीएमपीएल प्रशासनासह स्थानिक पोलिसांकडून दुर्लक्ष केले जात असल्यामुळे चोरट्यांचे फावले आहे. विशेषतः गर्दीची बसस्थानके, गर्दी असलेल्या बसेसमध्ये प्रवास करीत प्रवाशांचा ऐवज चोरून नेला जात असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.
धायरीतील गोदामातून २० लाखांचे केमिकल चोरीला – सविस्तर बातमी – सविस्तर बातमी
जेजुरी ते हडपसर गाडीतळ असा पीएमपीएल बसप्रवास करणार्या महिलेच्या गळ्यातील तब्बल २ लाख रूपये किंमतीची सोन्याची बांगडी चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना १५ जूनला दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी पुणे-सोलापूर रस्ता परिससरातील टकलेनगरात राहणार्या ५३ वर्षीय महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला टकलेनगरात राहायला असून, कामानिमित्त १५ जूनला दुपारी साडेतीनच्या सुमारास जेजुरी ते हडपसर असा पीएमपीएल बसप्रवास करीत होती. त्यावेळी गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील दोन लाखांची सोन्याची चैन चोरून नेली. याप्रकरणाची माहिती झाल्यानंतर महिलेने तत्काळ पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलीस अमलदार आर. आर. मोरे तपास करीत आहेत.
पीएमपीएलमध्ये शिरताना जेष्ठेचे दागिने चोरीला
पीएमपीएल बसमध्ये शिरताना गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी जेष्ठ महिलेच्या हातातील ५२ हजारांची सोन्याची बांगडी कापून नेल्याची घटना घडली आहे. ही घटना १६ जूनला स्वारगेट मेट्रो स्टेशनजवळील बसस्थानकात घडली आहे. याप्रकरणी हडपसरमध्ये राहणार्या ६१ वर्षीय महिलेने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार जेष्ठ महिला हडपसरमध्ये राहायला असून, १६ जूनला स्वारगेटमधील मेट्रो स्टेशनजवळ असलेल्या बसस्थानकात थांबल्या होत्या. त्यावेळी बसमध्ये प्रवेश करताना गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी महिलेच्या हातातील ५२ हजारांची सोन्याची बांगडी कापून नेली. काही वेळानंतर लगेचच महिलेला हातात बांगडी नसल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी तत्काळ पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी पोलीस अमलदार टोणपे तपास करीत आहेत.






















