Breking News
तडीपार केलेल्या तीन महिला ताब्यात; तडीपार आदेशाचा भंग केल्याचे उघडWomen Scientists Felicitation Pune : श्री महालक्ष्मी मंदिरातर्फे महिला शास्त्रज्ञांचा सन्मानMaharashtra Drought Relief Measures 2026 : बंद पाणीपुरवठा योजना तातडीने सुरू करा; टँकरचा पर्याय शेवटी वापरा–महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेAnubandh Support Group Pune : एकटेपणावर मात करण्यासाठी अनुबंधसारखे आधारगट हवे- विजया रहाटकरDagdusheth Ganpati Trust : ‘दगडूशेठ’ गणपती ट्र्स्ट तर्फे ५०० ज्येष्ठांना मोफत श्रवणयंत्रPolice Constable Suspension : इन्स्टाग्रामवरील बातमीवर आक्षेपार्ह टिप्पणी भोवलीPune Crime News : तडीपारीचा आदेश धुडकावून आरोपी महिला शहरात आल्याPune Mobile Theft Case : मोबाईल चोरणारा २४ तासांत जेरबंद; लक्ष्मीनगर पोलिसांची कारवाईMaharashtra Education News : दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क घेऊ नका; घेतले असल्यास परत कराPune Fertilizer License Suspended : रब्बी हंगामात खत विक्रीतील अनियमिततेप्रकरणी जिल्ह्यात चार वितरकांचे परवाने निलंबित

पुण्यात भाजी विक्रेता, पानटपरी चालकाकडून ३ पिस्तूल जप्त

तिघांना अटक, आंबेगाव पोलिसांची कामगिरी

marathinews24.com

पुणे – भाजी विक्रेत्यासह पानटपरी चालक आणि गॅरेज व्यावसायिकांना गावठी पिस्तूल बाळगल्याप्रकरणी आंबेगाव पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून ३ गावठी पिस्तूल, जिवंत काडतुस असा १ लाख २० हजारांच शस्त्रसाठा जप्त केला आहे. राजन विनोद शहा (रा. धायरीगाव) अनिल कैलास चौधरी (वय २६ रा. संदेश रेसिडन्सी, धायरीगाव) प्रथम अरूण रेणुसे (वय २४ रा. नाईक आळी, धायरीगाव)अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

‘आखाड पार्टीत तडीपार गुंडाच्या डोक्यात दगड घातला – सविस्तर बातमी

आंबेगांव पोलीस ठाण्याचे अंमलदार ज्ञानेश्वर चित्ते, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, सुभाष मोरे हे १० ऑगस्टला पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी त्यांना जांभुळवाडी रोड, शनिनगरात शस्त्र घेउन तीनजण थांबल्याची माहिती मिळाली. त्यांच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती मिळताच एपीआय महेश नायकवडी, उपनिरीक्षक युवराज शिंदे यांच्या पथकाने सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ३ गावठी अग्निशस्त्र व ०१ जिवंत काडतूस जप्त केले आहे. संबंधिताविरूद्ध भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३(२५) व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (२) (३) सह १३५ अन्वये गुन्हा केला आहे.

आरोपी राजेश शहा हा भाजी विक्रेता असून, अनिल चौधरी हा पानटपरी चालक आहे. तर प्रथम रेणुसे हा गॅरेज व्यावसायिक आहे.आरोपींनी कशासाठी पिस्तूल बाळगले होते, त्यांनी पिस्तूलांची खरेदी कोठून केली. त्यांना शस्त्र पुरवणारा कोण आहे, याचा तपास पोलीस करीत आहेत. ही कामगिरी उपायुक्त मिलींद मोहिते, एसीपी राहुल आवारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने, पोलीस निरीक्षक चांगदेव सजगणे, चेतन गोरे, हणमंत मासाळ, हरीश गायकवाड, निलेश जमदाडे, अवधुत जमदाडे, आकाश फासगे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, प्रमोद भोसले, नितीन कातुर्डे, सुभाष मोरे, अजय कामठे, ज्ञानेश्वर चित्ते, शिवाजी पोटोळे, योगेश जगदाळे, राकेश टेकावडे, फिरोज शेख यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×