Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

चांगल्या परताव्याचे आमिष पडले ५ लाखांना

पाॅलिसीची रक्कम मिळवून देण्याच्या आमिषाने ४० लाखांची फसवणूक

तब्बल ५ लाख १२ हजारांचा ऑनलाईन घातला गंडा

marathinews24.com

पुणे – टास्क पुर्ण करून त्याद्वारे चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी तरूणाला तब्बल ५ लाख १२ हजारांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना ५ जानेवारी २०२५ ते ६ जानेवारी २०२६ कालावधीत वाघोलीत घडली आहे. याप्रकरणी तरूणाने वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारक, लिंकधारकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

आंबेगावात घरफोडी, रोकडसह दागिने चोरीला – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे वाघोलीत राहायला असून, ५ जानेवारी २०२५ रोजी सायबर चोरट्यांनी त्यांना व्हॉटसअ‍ॅप ग्रुपमध्ये समाविष्ट करून घेतले. त्यानंतर टास्क पुर्ण करून त्याद्वारे चांगला परतावा देण्याचे आमिष सायबर चोरट्यांनी दाखविले. सायबर चोरट्यांनी तक्रारदाराचा विश्वास संपादित करून त्यांना रक्कम पाठवण्यास भाग पाडले. तब्बल ५ लाख १२ हजार रूपये ऑनलाईनरित्या वर्ग केल्यानंतरही त्यांना परतावा मिळाला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड तपास करीत आहेत.

औंधमध्ये पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

पुणे- रस्त्याने पायी चाललेल्या महिलेचा पाठलाग करून दुचाकीस्वार दोघा चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील १ लाखांचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेले. ही घटना २० मे रोजी सकाळी अकराच्या सुमारास औंधमधील सनग्रेस सोसायटीजवळ घडली आहे. याप्रकरणी औंधमध्ये राहणार्‍या महिलेने चतुःशृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला औंधमध्ये राहायला असून, २० मे रोजी सकाळी अकराच्या सुमारास कामानिमित्त सनग्रेस सोसायटीजवळून पायी जात होती. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी महिलेजवळ येउन त्यांच्या गळ्यातील १ लाखांचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेले. महिलेने आरडाओरड करेपर्यंत चोरटे पसार झाले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×