Breking News
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून पुणे जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम प्रकल्पांचा आढावाउपमुख्यमंत्र्यांकडून हिंजवडी परिसरातील नागरी व पायाभूत सुविधांच्या प्रश्नांचा आढावाबोपोडीतील रेडीरेकनरचा कमी असलेला दर वाढविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार पुण्यात विद्यानंद बापट यांच्या मारहाणीचा निषेधदहीहंडी महोत्सवात पुणेकर अनुभवणार ‘दशावतार’पुण्यात गणशोत्सवात चार बेस, चार टॉपची मर्यादापुण्यात विद्यानंद बापट यांना मारहाण, पुणेकरांच्या संतप्त प्रतिक्रियापुणे-पिंपरीत ऑटोरिक्षा भाडेवाढ लागू; रात्रीच्या प्रवासाला २५ टक्के अतिरिक्त भाडेदहीहंडी उत्सवासाठी पुणे शहरातील वाहतुकीत बदलपुण्यात पानटपरी चालकाकडून ३०० रुपये हप्ता; खराडीतील पोलिस निलंबित

मौजमजेसाठी चोरल्या ५ दुचाकी, आरोपीला अटक

मौजमजेसाठी चोरल्या ५ दुचाकी, आरोपीला अटक

समर्थ पोलिसांची कामगिरी

marathinews24.com

पुणे – मौजमजेसाठी चोरल्या ५ दुचाकी, आरोपीला अटक – मौजमजा करण्यासाठी दुचाकींची चोरी करणार्‍याला समर्थ पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. सुजल जीतेश जगताप (वय २२ रा. राजेवाडी नाना पेठ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. चोरट्याने समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरून नेल्याची घटना २७ जुलैला घडली होती. घराच्या खाली लॉक लावुन पार्क केली मोटर सायकल चोरीप्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू होता. पोलीस तपास पथकाने परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले होते.

धनकवडीत टोळक्याची दहशत; उसने पेैसे परत न केल्याने मारहाण – सविस्तर बातमी 

पोलीस अंमलदार इम्रान शेख व शरद घोरपडे यांना दुचाकी चोरटा राजेवाडीत राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने ३ ऑगस्टला सापळा रचून सुजल जगताप याला कात्रज परीसरात ताब्यात घेतले.चौकशीत त्याने अल्पवयीन साथीदाराच्या मदतीने दुचाकी चोरल्याची कबुली दिली. अधिक चौकशीत त्याने यापुर्वीही दुचाकी चोरल्याचे सांगितले. बंडगार्डन, कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरल्याचे उघडकीस आले. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते, पोलीस निरीक्षक चेतन मोरे, उपनिरीक्षक जालिंदर फडतरे, संतोष पागार, रविंद्र औचरे, रोहीदास वाघेरे, इम्रान शेख, शिवा कांबळे, अमोल गावडे, शरद घोरपडे, भाग्येश यादव यांनी केली.

इमारतीच्या पार्विंâगमधून दुचाकी चोरणार्‍याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने मौजमजा करण्यासाठी दुचाकी चोरल्याची कबुली दिली आहे. उमेश गित्ते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, समर्थ पोलीस ठाणे

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×