पार्टटाईम नोकरीचे आमिष पडले ६ लाखांना

पुण्यातील व्हॅलेंटिना इंडस्ट्रीजचे दोघे मोटारीची काच फोडून ऐवजाची चोरीफरार

वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – पार्टटाईम आमिषाला बळी पडून तरूणाने ६ लाख २८ हजार रूपये गमावले आहेत. सायबर चोरट्यांनी तरूणाला रिव्ह्यू देण्याचा टास्क देउन जास्त नफा कमवण्याचे आमिष दाखवून फसवणूक केली आहे. ही घटना १२ ते १९मे २०२५ कालावधीत वारजे माळवाडी परिसरात घडली आहे. याप्रकरणी २५ वर्षीय तरूणाने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारक, लिंकधारकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पुण्यात रुग्ण महिलेचे दागिने चोरीला – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरूण हा वारजे माळवाडीत राहायला असून, १२ मे २०२५ सायबर चोरट्यांनी त्याला पार्टटाईम नोकरी देण्याचे आमिष दाखवले. तरूणाचा विश्वास संपादित करून टेलीग्रामवर लिंक पाठवून रिव्ह्यू देण्याचा टास्क दिला. जादा नफा देण्याचे आमिष दाखवून तक्रारदाराकडून तब्बल ६ लाख २८ हजार रूपये वर्ग करून घेत फसवणूक केली आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक प्रकाश धांडे तपास करीत आहेत.

सव्वा तीन लाखांची सोन्याची चैन हिसकावली

पुणे- मण्णपुरम गोल्ड फायनान्समध्ये ठेवलेली सोन्याची चैन ताब्यात घेतल्यानंतर महिलेने हिसकावून पळवून नेली. ही घटना १२ मे रोजी संध्याकाळी सहाच्या सुमारास चंदननगरमधील मण्णपुरम गोल्ड फायनान्ससमोर घडली आहे. याप्रकरणी सदाशिव टाक (वय ५३ रा. शिरूर घोडनदी, शिरूर) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार राहूल सुखदेव गायकवाड (रा. कोहकडी, पारनेर, अहिल्यानगर ) आणि अर्चना पठारे यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार सदाशिव टाक हे शिरूर घोडनदी परिसरातील असून, त्यांनी मण्णपुरम गोल्ड फायनान्समध्ये सोने ठेवले होते. त्यांनी ३ लाख २४ हजार रूपये जमा करून १५ ग्रॅम सोन्याची चैन सोडवून घेतली. त्यानंतर ते मण्णपुरम गोल्ड कार्यालयातून बाहेर आले असता, आरोपींनी त्यांना अडवून ३ लाख २४ हजारांची सोन्याची चैन हिसकावून नेली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक दशरथ तदेलवार तपास करीत आहेत.

दीड लाखांचा मोबाइल, लॅपटॉप चोरीला

खोलीचा उघडा दरवाजा असल्याची संधी साधून चोरट्यांनी १ लाख ४० हजारांचा मोबाइल, लॅपटॉप चोरून नेला. ही घटना १ जूनला खराडीतील लक्ष्मी बालाजी पी.जी रूममध्ये घडली आहे. याप्रकरणी २२ वर्षीय मुलाने खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खराडीत लक्ष्मी बालाजी पी.जी असून, त्याठिकाणी विद्यार्थी, नोकरदार राहायला आहेत. १ जूनला पी.जीमधील रूमचा अर्धवट दरवाजा उघडा असल्याची संधी साधून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश केला. १ लाख ४० हजार रूपये किंमतीचे मोबाइल, लॅपटॉप चोरून नेला. याप्रकरणी पोलीस अमलदार साबळे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×