६५७ पर्यटकांचा जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाशी संपर्क…जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
marathinews24.com
पुणे – जम्मू काश्मीरमध्ये अडकलेल्या ६५७ पर्यटकांनी जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षास संपर्क साधला असून २७ एप्रिलपर्यत १४८ पर्यटक पुण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिली आहे.
जम्मु काश्मीरमधून पुण्यात गुरुवारी सकाळी दहा वाजता विमानाने ११ प्रवासी पोहचले असून आणखीन १९ प्रवासी विमानाने येत आहेत. २५ एप्रिलला ७७ तर २६ एप्रिलला १२ प्रवासी विमानाने येणार आहेत. २७ एप्रिल रोजी २९ पर्यटक रेल्वेने येणार आहेत. नियंत्रण कक्ष सर्व पर्यटकांच्या संपर्कात असून पर्यटकांकडून माहिती घेण्याची कार्यवाही सुरू आहे, असेही जिल्हाधिकारी डूडी यांनी सांगितले आहे.





















