Breking News
मार्केट यार्डातील दुकानातून वेलदोडे, रोकड चोरीलाआंबेगाव परिसरात घरफोडी; १ लाखांचे दागिने चोरीलाकात्रज चौकातील उड्डाणपुलाच्या कामानिमित्त वाहतूक बदलभटके विमुक्त समाजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य; कारवाईची मागणीउपलब्ध पाणीसाठ्याचे काटेकोरपणे व्यवस्थापन करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांचे निर्देशविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम सर्व विभागांनी समन्वयाने यशस्वी करावामहाराष्ट्र गोसेवा आयोग व पशुसंवर्धन विभागातर्फे २२ जूनपासून राज्यभर ‘राज्यमाता गोमाता संवाद यात्रा’चे आयोजन – शेखर मुंदडाबीडमध्ये एफडीएची मोठी कारवाई; केजमध्ये विशाल डेअरीवर धाडरिक्षा चालकाला मारहाण करून लुटणाऱ्या टोळीला अटकदुचाकी मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक राखून ठेवण्याबाबत अर्ज स्वीकारण्यास सुरुवात

जादा परताव्याचे आमिष पडले ७१ लाखांना

पुण्यात शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने १२ काेटीची फसवणूक

सायबर चोरट्याने घातला गंडा

marathinews24.com

पुणे – आयपीओसह शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळवून देतो, अशी बतावणी करीत सायबर चोरट्याने एकाला तब्बल ७१ लाख २० हजारांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना २४ डिसेंबर २०२४ ते ५ मार्च २०२६ कालावधीत कोथरूडमध्ये घडली आहे. याप्रकरणी ५३ वर्षीय नागरिकाने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारक, लिंकधारकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

झोपलेल्या चालकाच्या अंगावरून गेला ट्रक – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे कोथरूडमध्ये राहायला असून, डिसेंबर २०२४ मध्ये सायबर चोरट्यांनी त्यांना एका व्हॉटसअ‍ॅप गु्रपमध्ये समाविष्ट केले होते. त्याठिकाणी आयपीओ आणि शेअर मार्केटबाबत चर्चा करून तक्रारदाराचा विश्वास संपादित केला. जादा परताव्याच्या आमिषाला भुलून तक्रारदाराने गुंतवणूकीला सुरूवात केली. जवळपास पावणेदोन वर्षांत त्यांनी ७१ लाख २० हजार रूपये संबंधितांच्या बँकखात्यात वर्ग केले. मात्र, त्यांना परतावा मिळाला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे तपास करीत आहे.

जॉबच्या बहाण्याने तरूणीची फसवणूक

जॉब देण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी तरूणीकडून तब्बल ८ लाख ९१ हजार रूपये ऑनलाईनरित्या वर्ग करून घेत फसवणूक केली आहे. ही घटना ९ ते १३ मे २०२६ कालावधीत कोंढवा बुद्रूकमध्ये घडली आहे. याप्रकरणी संबंधित तरूणीने कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारक, लिंकधारक, बँकखातेधारकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×