Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

पुण्यात ८ बांग्लादेशी महिलांना अटक

फरासखाना पोलिसांची कारवाई

marathinews24.com

पुणे – पुण्यात ८ बांग्लादेशी महिलांना अटक – भारतात विनापरवाना येउन पुण्यातील बुधवार पेठ वेश्याव्यवसाय करणार्‍या बांग्लादेशी महिलांचा फरासखाना पोलिसांनी पर्दापाश केला आहे. याप्रकरणी ८ महिलांना अटक केले आहे. अंजुरा बेगम कामरुल चौधरी (वय ४०), खदीजा बेगम महाबुर शेख (वय २७) पारोल बेगम मिठु शेख (वय ३८) तंजीला बेगम आलमगीर काझी (वय ४०) रुपाली बेगम अकबर शेख (वय ३८) मन्सुरा रफिक हवालदार अख्तर (वय १९) सिमा आलमगीर शेख (वय ४५) खातून फोजर गाजी वय ३२ रिना गाजी (वय ३२ सर्व रा. बुधवार पेठ पुणे, मूळ बांगलादेश) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्या आदेशानुसार पोलिसांनी सर्चमोहिम राबविली.

पर्यटन उद्योगाला पुणे ग्रॅण्ड चॅलेंज टुर स्पर्धेच्या माध्यमातून चालना मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – सविस्तर बातमी

विनापरवाना राहणार्‍या बांग्लादेशी नागरिकांची सर्चमोहिम राबवून कारवाईचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले होते. त्यानुसार फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रशांत भस्मे यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवार पेठेत शोधमोहिम राबविली. पथकाने ढमढेरे गल्लीतील आशा इमारतीत छापा टाकून ८ बांग्लादेशी महिलांना ताब्यात घेत अटक केली. ही कामगिरी पोलीस निरीक्षक अजित जाधव, उत्तम नामवाडे, एपीआय वैभव गायकवाड, शितल जाधव, उपनिरीक्षक अरविंद शिंदे, उपनिरीक्षक पुनम पाटील, मेहबुब मोकाशी, खराडे, निढाळकर, शिंदे, तेलंगे, नांगरे, पासलकर, शिंदे, साबळे, शिंदे, पाटील, करदास, मनीषा पुकाळे, कांबळे, गजानन सोनुने, पवार, नितीन जाधव, खुट्टे, जाधव, फिराज शेख, पालांडे, जुंबड, मपोशि, भालेराव, राऊत, चोरघडे, ढवळे, बनसोडे, जाधव, महाडिक, ओव्हाळ, यांनी केली.

छुप्या पध्दतीने बॉर्डर पार करुन हिंदुस्थानात

बांग्लादेशी महिला छुप्या पद्धतीने देशाची सीमा पार करुन अवैधरित्या हिंदुस्थानात आल्या होत्या. त्यानंतर त्यांनी आपण पश्चिम बंगालमधील रहिवाशी असल्याचे सांगुन, पुण्यातील रेडलाईट एरियामध्य वेश्या व्यवसायाचा मार्ग पत्करला होता. वेश्याव्यवसाय करुन, त्यांची उपजिवीका भागवित असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यांना ताब्यात घेउन, पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×