Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

आईस्क्रीमची शाखा देण्याच्या नावाखाली ८ लाखांचा गंडा

पेट्रोल पंपात भागीदारीच्या आमिषाने २ कोटी २९ लाखांची फसवणूक

मांजरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – आईस्क्रीमची शाखा (फ्रन्चाइशी) देण्याची बतावणी करून सायबर चोरट्यांनी तरूणाला तब्बल ८ लाख ३५ हजारांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना १५ मे ते २७ जून २०२५ कालावधीत मांजरी बुद्रूकमध्ये घडली आहे. याप्रकरणी तरूणाने मांजरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारक, बँकखातेधारकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मुळशी पॅटर्नप्रमाणे रिक्षा चालकावर कोयत्याने वार – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरूण मांजरी बुद्रूक परिसरात राहायला असून, त्यांनी आईस्क्रीमची शाखा घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज केला होता. त्यानुसार १५ मे २०२५ रोजी सायबर चोरट्यांनी त्यांना फोन करून आईस्क्रीम संबंधित संपुर्ण माहिती दिली. त्यानंतर आईस्क्रीम शाखेसाठी आवश्यक खर्चासाठी तब्बल ८ लाख ३५ हजार रूपये ऑनलाईनरित्या वर्ग करण्यास भाग पाडले. मात्र, त्यांना आईस्क्री शाखा न देता फसवणूक केली आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक इरफान नदाफ तपास करीत आहेत.

दुचाकीच्या पार्किंगच्या वादातून तरूणाला मारहाण

पुणे- रहदारीला दुचाकीचा त्रास होत असल्याचा आरोप करीत सात ते आठजणांच्या टोळक्याने तरूणाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर हातातील शस्त्रास्त्रे हवेत फिरवून नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली. ही घटना १७ मे रोजी रात्री सव्वा दहाच्या सुमारास कोंढवा खुर्दमधील शिवनेरीनगरात घडली आहे. दिलशाद सज्जाद शेख (वय २१, रा. कोंढवा) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. त्याने दिलेल्या तक्रारीनुसार तरबेज मलिक याच्यासह साथीदारांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरूण दिलशाद मूळचा पश्चिम बंगालमधील असून, तो शिवनेरीनगरात राहायला आहेत. घराबाहेर तो दुचाकी उभी करीत असल्याचा राग आरोपी तरबेज मलिक याला होता. त्याच रागातून त्याने साथीदारांना बोलावून घेतले. दिलशादला बेदम मारहाण करीत त्याच्यावर हत्याराने वार केला. त्यानंतर हातातील शस्त्रास्त्रे हवेत फिरवून नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक राहूल शेलार तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×