Breking News
ठेकेदाराच्या कुटुंबाला धाक दाखवून २७ लाखांची घरफोडीमहात्मा जोतीराव फुले द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त पशुसंवर्धन विभागाचे विविध उपक्रमपुण्यात नवले ब्रीज परिसरात वेश्या व्यवसायाचा पर्दाफाशअल्पवयीन मुलाशी अश्लील कृत्य; तिघांविरुद्ध गुन्हाकात्रजमध्ये अल्पवयीनावर शस्त्राने वार करून खून‘मिशन क्रॅकडाऊन’ अंतर्गत बेकायदा धंद्यांवर कारवाईदिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त बारामती एमआयडीमध्ये १ हजार वृक्ष लागवडीचे नियोजन-प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटीलअंगणवाडीच्या पोषण आहारात बदल; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलावविद्यार्थ्यांच्या सहभागामुळे एसआयआर मोहिमेला गतीडंपरच्या धडकेत पदाचारी ठार, पुणे महापालिकेजवळील अपघात

मुळशी पॅटर्नप्रमाणे रिक्षा चालकावर कोयत्याने वार

कायदा सुव्यस्थेची एैशीतैशी, पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह

marathinews24.com

पुणे – शहरात खून, खूनाचा प्रयत्न, महिला अत्याचारासह गंभीर घटनांचा आलेख वाढत आहे. असे असतानाही पोलीस बघ्याची भूमिका घेत आहेत का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दुसरीकडे मात्र, पुणेकरांच्या सुरक्षिततेसाठी आम्ही तडजोड करणार नसल्याचा वारंवार दावा करणारे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशाला स्थानिक पोलिसांकडून हरताळ दिला जात आहे का, असाही सवाल गंभीर घटनांमुळे पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत.

डेक्कनमध्ये उद्योजकाची आत्महत्या; चौघांविरुद्ध गुन्हा – सविस्तर बातमी

मुळशी पॅटर्नप्रमाणेच रिक्षा चालकाला पळवून त्याच्यावर कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना १८ मे रोजी सकाळी दहाच्या सुमारास नवले ब्रीजकडे जाणार्‍या भुयारी मार्गाजवळ घडली आहे. टोळक्याने संबंधित तरूणावर कोयत्याने वार केला, त्यानंतर तो तरूण पुलावरून थेट १५ ते २० फुट खाली पडला. त्यानंतरही टोळक्याची मस्ती थांबली नाही. त्यांनी परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी कोयते फिरवले. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी धाव घेतली. याप्रकरणी आता राजकीय पदाधिकार्‍यांकडून पुण्यातील कायदा सुव्यस्थेबाबत पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

रिक्षात प्रवासी भरण्याच्या जुन्या वादातून टोळक्याने रिक्षा चालकावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची धक्कादायक घटना कात्रज ते नवले ब्रिज दरम्यान असलेल्या राजमाता भुयारी मार्गाजवळ सोमवारी सकाळी १० वाजता घडली. सुरज माणिक काळे (वय ३०, रा. जैन मंदिराजवळ, कात्रज, पुणे) असे जखमी रिक्षा चालकाचे नाव आहे. याप्रकरणी गणेश कोंडिबा गोरे वय २७, गोकुळनगर, कात्रज) गणेश हरीभाउ धरपाळे वय ३६ रा. आंबेगाव पठार) बापु बाळासाहेब भोसले वय ३५ रा. कात्रज) यांना अटक केली आहे. कोयता हल्ल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

कोयता गँगचा राडा, पोलीस हतबल

दिवे घाटात कोयता गँगने घातलेला राडा, रिक्षा चालकावर कोयत्याने वार करून खूनाचा प्रयत्नाची घटनेने खळबळ उडाली आहे. शहरात कोयता गँगचे अवलोकन सर्रासपणे सुरू असताना पोलीस काय करीत आहेत. प्रिव्हेटिंव्ह अ‍ॅक्शनच्या नावाखाली नेमकी कसली कारवाई केली जात आहे. मागील अनेक महिन्यांपासून कोयता निर्मितीसह विक्री करणार्‍यांची साधी विचारपूसही केली जात नाही. बाजारातून ही हत्यारे मिळवण्यास गुन्हेगारांविरूद्ध वचक नसल्याचे दिसून आले आहे. त्यातच गुन्हे शाखेला आलेली मरगळीमुळे गुन्हेगारांचे फावले आहे. त्यामुळे पदभार घेतलेले अधिकारी पथकांना कामाला लावतील का, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×