सराफ व्यावसायिकांसह १३ जणांविरुद्ध गुन्हा
marathinews24.com
पुणे – बनावट सोने तारण ठेवून राष्ट्रीयीकृत बँकेची चार कोटी २३ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात दोन सराफ व्यावसायिकांसह १३ जणांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.
काेथरूड भागात तरुणावर शस्त्राने वार – सविस्तर बातमी
याबाबत राष्ट्रीयीकृत बँकेच्या व्यवस्थापकाने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सराफ व्यावसायिकांसह १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे सिंहगड रस्त्यावरील हिंगणे खुर्द येथील एका राष्ट्रीयीकृत बँकेत शाखा व्यवस्थापक आहेत. आरोपी सराफ व्यावसायिकांची बँकेकडून मूल्यांकनकार (व्हॅल्यूअर) म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. आरोपींनी बँकेत कमी शुद्धतेचे सोने तारण ठेवून कर्ज मिळवले. आरोपी मूल्यांकनकार यांनी बनावट सोने हे शुद्ध असल्याचे प्रमाणपत्र बँकेला दिले होते. बनावट प्रमाणपत्राच्या आधारे आरोपींनी २६ कर्जप्रकरणांद्वारे बँकेकडून चार कोटी ४४ लाख रुपयांचे कर्ज मंजूर करवून घेतले. आरोपी मूल्यांकनकारांनी दिलेल्या प्रमाणपत्राबाबत बँकेला संशय आला. त्यामुळे बँकेत तारण ठेवलेल्या या सोन्याचे परीक्षण पुन्हा करण्यात आले. तेव्हा फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला. आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक दीपाली भुजबळ तपास करत आहेत.
गुंतवणुकीच्या आमिषाने १ कोटी ६८ लाखांची फसवणूक
शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने दोघांची १ कोटी ६८ लाखांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एकाने नांदेड सिटी पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेला एक आरोपी सोलापूर जिल्ह्यातील आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे सिंहगड रस्ता परिसरातील धायरी भागात राहायला आहेत. आरोपींनी तक्रारदाराला शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखविले होते. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास १५ टक्के परतावा मिळेल, असे आमिष दाखवून आरोपींनी त्यांना तक्रारदारासह त्यांच्या मित्राला जाळ्यात ओढले. त्यानंतर त्यांच्याकडून वेळोवेळी पैसे घेतले. तक्रारदारसह मित्राला परतावा दिला नाही. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस निरीक्षक राऊत तपास करत आहेत.






















