Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

डेक्कनमध्ये उद्योजकाची आत्महत्या; चौघांविरुद्ध गुन्हा

मोटारीच्या दरवाज्यावर आदळून दुचाकीस्वाराचा मृत्यू

चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – शहरातील मध्यवर्ती डेक्कन जिमखाना भागातील तारांकित हाॅटेलमध्ये उद्योजकाने केलेल्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी चौघांविरुद्ध गु्न्हा दाखल  करण्यात आला. आर्थिक फसवणुकीमुळे उद्योजकाने आत्महत्या केल्याचे तपासात उघडकीस आले. याबाबत मोहित अशोक जैन (वय ३२, रा. मीनाक्षी सोसायटी, सॅलिसबरी पार्क, गुलटेकडी ) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, नथुसिंह राजपुरोहित, सतीश राजपुरोहित, भगवान राजपुरोहित, प्रल्हाद चौधरी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नीट पेपरफुटी प्रकरणात प्रा. शिवराज मोटेगावकर अटकेत – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक जैन हे उद्योजक होते. आपटे रस्ता परिसरातील एका तारांकित हाॅटेलमध्ये त्यांनी १० मे रोजी विषारी ओैषध पिऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. जैन यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांनी जप्त केली होती. याप्रकरणी सुरुवातीला अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली. आरोपींनी जैन यांची आर्थिक फसवणूक केल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचे मोहित जैन यांनी फिर्यादीत म्हटले आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक भोसले या प्रकरणाचा तपास करत आहेत.

प्रेमप्रकरणातून तरुणीची आत्महत्या; तरुणीसह दोघे अटकेत

प्रेमप्रकरणातून तरुणीने आत्महत्या केल्याची घटना लोणीकंद भागात नुकतीच घडली. तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी दोघांना लोणीकंद पोलिसांनी अटक केली. सौरभ गंगाधर जगताप (वय २२, रा. रामनगर, पेरणे फाटा, अहिल्यानगर रस्ता), काजल संजय तिवारी (वय १९, रा. पेरणे फाटा, अहिल्यानगर रस्ता) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत तरुणीच्या आईने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्या केलेल्या तरुणीचे आरोपी सौरभ यांच्याशी प्रेमसंबंध होते. सौरभची काजल तिवारी हिच्याशी प्रेमप्रकरण सुरू असल्याचा संशय तरुणीला होता. या कारणावरुन त्यांच्यात वाद झाले होते. आरोपींच्या त्रासामुळे तरुणीने जानेवारी महिन्यात आत्महत्या केली होती. सुरुवातीला या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली होती. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला. आरोपींच्या त्रासामुळे मुलीने आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक विजया वंजारी तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×