Breking News
ब्लॅक स्पॉटचे निरीक्षण करून १० ऑक्टोबरपूर्वी आवश्यक उपाययोजनांद्वारे निर्मूलन कराकर्जमुक्ती योजनेच्या लाभ वितरणास प्रारंभ; प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसअन्यायाविरोधात डॉक्टरांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना मदतीचा हातपुण्यात चार घरफोड्या; ८ लाखांचा ऐवज चोरलाराज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी मुख्य ध्वजारोहण समारंभहडपसरमध्ये दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूहवाई दलातील तोतया जवानाला पकडलेसराईत चौघे पुणे जिल्ह्यातून तडीपार; वाघोली पोलिसांची कारवाईनोंदणीकृत सेवादातांकडूनच कृत्रिम रेतन करा 

सुवर्णकाळातील ‘शलाका’ या सुरेल कार्यक्रमाचे आयोजन

गोल्डन एरा गाण्यांची मैफल; १७ एप्रिलला रसिकांसाठी खास पर्वणी, सुवर्णकाळातील सुरांची मैफल; ‘शलाका’तून जुन्या आठवणींना उजाळा मिळणार

marathinews24.com

पुणे – संगीतप्रेमींसाठी आनंदाची बातमी म्हणजे ‘दिशा इव्हेंट्स’ प्रस्तुत “सुवर्णकाळातील शलाका” हा विशेष संगीत कार्यक्रम येत्या १७ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता बालशिक्षण, मयूर कॉलनी येथील एम. इ.एस सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. सुवर्णकाळातील गाजलेल्या अभिनेत्री आणि त्यांच्या चित्रपटांवर आधारित अजरामर गीतांची ही मैफल रसिकांना भूतकाळातील सुरेल आठवणींच्या दुनियेत घेऊन जाणार आहे.

केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्या हस्ते ‘जन सेहत सेतू’ शिबीराचे व पोर्टलचे लोकार्पण – सविस्तर बातमी

या कार्यक्रमाची संकल्पना व आयोजन सुप्रसिद्ध गायिका शलाका घैसास यांनी केले असून त्या स्वतःही आपल्या आवाजाने या मैफलीत रंग भरतील. कार्यक्रमाचे निवेदन मनीष गोखले करणार आहेत. या सुरेल कार्यक्रमात गायक अजय राव, प्रसाद केळकर आणि अतुल किल्लेदार हे आपापल्या सादरीकरणातून रसिकांना मंत्रमुग्ध करणार आहेत.

तसेच वाद्यसंगतीसाठी अमन सय्यद, ओंकार पाटणकर, हार्दिक रावल, विशाल गंद्रुतवार, संजय खाडे आणि चार्ल्स किंजवाडेकर यांचा सहभाग असणार आहे.

विशेष म्हणजे, हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य ठेवण्यात आला असून सुवर्णकाळातील सुरांची ही मेजवानी अनुभवण्यासाठी पुणेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×