Breking News
नोंदणीकृत सेवादातांकडूनच कृत्रिम रेतन करा ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–2026’परदेशी अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहनचाकण एमआयडीसी परिसरातील सर्व रस्ते २५ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देशखुनातील आरोपीला १२ कोयत्यांसह पकडलेसायबर फसवणूकीच्या रकमेसाठी बँक खात्याचा वापरपुण्यात दुचाकींच्या सायलेन्सरमध्ये फेरफार; २७४ दुचाकी चालकांविरुद्ध कारवाई९३ लाखांची फसवणूक प्रकरणात पसार आरोपींना पकडलेयेरवडा जेलबाहेर फटाके उडवून आरोपीचे उदात्तीकरणफरार आरोपीसह दोघांना अटक; ३ पिस्टल जप्त

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतील उमेदवारांच्या खर्चाची दुसरी तपासणी पूर्ण

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतील उमेदवारांच्या खर्चाची दुसरी तपासणी पूर्ण

२३ पैकी २२ उमेदवारांकडून खर्च अहवाल सादर; तिसरी व अंतिम तपासणी २१ एप्रिलला होणार

बारामती – आगामी २३ एप्रिल रोजी होणाऱ्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक खर्चावर काटेकोर नियंत्रण ठेवण्यासाठी नियुक्त खर्च निरीक्षक बनोत अखिल रामनाईक यांनी उमेदवारांच्या दैनंदिन निवडणूक खर्चाची दुसरी तपासणी आज पूर्ण केली.

एआय सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ; दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी आरोग्य विभाग कटिबद्ध -राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर – सविस्तर बातमी 

या पोटनिवडणुकीत एकूण २३ उमेदवार निवडणूक रिंगणात असून, निवडणूक कालावधीत त्यांच्या खर्चाची एकूण तीन टप्प्यांत तपासणी करण्यात येत आहे. त्यानुसार पहिली तपासणी १३ एप्रिल रोजी पार पडली होती, तर दुसरी तपासणी १७ एप्रिल रोजी पूर्ण झाली आहे. तिसरी आणि अंतिम तपासणी २१ एप्रिल रोजी होणार आहे.

आज झालेल्या तपासणीदरम्यान २३ पैकी २२ उमेदवारांनी आतापर्यंतचा दैनंदिन निवडणूक खर्चाचा अहवाल खर्च निरीक्षकांकडे सादर केला. सादर करण्यात आलेल्या खर्चाच्या नोंदींची सखोल पडताळणी करण्यात आली.
यावेळी सहाय्यक खर्च निरीक्षक सुरेंद्र वाघमारे, संजय शेलार, खर्च पथक प्रमुख तुषार मोरे, व्हिडिओ व्हिजिलन्स टीम (VVT) प्रमुख श्री. लोदडे तसेच खर्च पथकातील सदस्य अशोक शिरतोडे, स्वप्नील आपुणे, स्वाती दराडे, अक्षय मांडवे, प्राची सपकाळ आणि सागर जगताप उपस्थित होते.

यावेळी निरीक्षक रामनाईक यांनी अकाउंटिंग, व्हिडिओ व्हिजिलन्स टीम (VVT), व्हिडिओ सर्व्हेलन्स टीम (VST) तसेच तक्रार निवारण पथक यांच्या कामकाजाचा आढावा घेतला. संबंधित विभागांनी परस्पर समन्वय साधून पारदर्शक आणि निष्पक्ष निवडणूक प्रक्रिया राबवावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×