Breking News
नामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागात

राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांची संसदीय स्थायी समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती

वैज्ञानिक प्रगती आणि पर्यावरण धोरणांमध्ये डॉ. मेधा कुलकर्णी यांची महत्त्वपूर्ण भूमिका

marathinews24.com

पुणे – राज्यसभेच्या खासदार प्रा. डॉ. मेधा विश्राम कुलकर्णी यांची विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण, वने व हवामान बदल विषयक विभाग-संबंधित संसदीय स्थायी समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यसभा सचिवालयाने जारी केलेल्या अधिकृत पत्रानुसार, कार्यसंचालन नियम २६९ अंतर्गत डॉ. कुलकर्णी यांची या समितीच्या सदस्यपदीही नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यसभेचे सभापती यांनी या नियुक्तीस मान्यता दिली आहे.

नॉर्वे दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शिष्टमंडळात ‘ग्रीनएक्स’च्या आरती भोसले-अहिवळे यांची निवड – सविस्तर बातमी

राज्यसभा सचिवालयाचे संयुक्त सचिव राकेश नैथानी यांनी डॉ. कुलकर्णी यांच्या नियुक्तीचे पत्र दिले. डॉ. कुलकर्णी यांची ही नियुक्ती १८ मे २०२६ पासून प्रभावी झाली आहे. विज्ञान व तंत्रज्ञान, पर्यावरण संरक्षण, वनसंवर्धन आणि हवामान बदलाशी संबंधित धोरणे, विधेयके व विविध विषयांचा अभ्यास करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी या समितीकडे असते. डॉ. कुलकर्णी या भाजपच्या ज्येष्ठ नेत्या असून, पुण्याच्या माजी आमदार आहेत. संसदेतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना याआधी संसदरत्न पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे.

या नियुक्तीबद्दल आनंद व्यक्त करत डॉ. कुलकर्णी म्हणाल्या, संसदीय स्थायी समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यामुळे देशातील वैज्ञानिक प्रगती, पर्यावरण संरक्षण आणि हवामान बदलासंदर्भातील धोरणात्मक चर्चेत योगदान देण्याची संधी मिळणार आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानात झपाट्याने होणारी प्रगती, पर्यावरण संवर्धन यावर काम करण्याचा माझा प्रयत्न असेल, असेही त्यांनी नमूद केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×