Breking News
पुण्यातील नवी पेठेत महिलेचे मंगळसूत्र हिसकावले‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे- साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेसेवेचा शुभारंभकल्याण रेल्वे यार्ड सुरक्षेसाठी अधिवेशनात उच्चस्तरीय बैठक‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे

दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट’ला ‘अ’ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा

राज्य सरकारचा मोठा निर्णय

marathinews24.com

पुणे – देशभरातील लाखो गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या पुण्यातील ‘श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट’ला राज्य सरकारतर्फे ‘अ’ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा जाहीर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘एक्स’ या समाजमाध्यमावरून ही महत्त्वपूर्ण घोषणा केली.

पुढील वर्षापासून ‘पुणे कृषी नवसंकल्पना स्पर्धा’ राज्यव्यापी; प्रथम पुरस्कार दिवंगत अजित पवार यांच्या नावाने देणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – सविस्तर बातमी

या निर्णयामुळे धार्मिक पर्यटन, पायाभूत सुविधा आणि परिसर विकासाला मोठी चालना मिळणार आहे. १८९३ मध्ये स्थापन झालेल्या या ट्रस्टला तब्बल १३५ वर्षांची वैभवशाली परंपरा लाभली आहे. हे मंदिर केवळ भक्तीचे स्थान नसून, समाजसेवा आणि सांस्कृतिक संवर्धनातही याचे मोठे योगदान आहे. दररोज देश-विदेशातून हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात.

यापूर्वी मंदिराला जिल्हा नियोजन समितीकडून ‘क’ वर्ग दर्जा प्राप्त होता. संस्थेचे सामाजिक कार्य आणि भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन, आमदार हेमंत रासने यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहून या मंदिरास ‘अ’ वर्ग दर्जा देण्याची मागणी केली होती.

‘अ’ वर्ग दर्जा मिळण्याचे फायदे
या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे मंदिर आणि परिसराचा तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळ म्हणून सर्वांगीण विकास वेगाने होणार आहे. ‘अ’ वर्ग दर्जा प्राप्त झाल्याने राज्य सरकारकडून विकासासाठी थेट आणि मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध होईल. या निधीच्या माध्यमातून देश-विदेशातून येणाऱ्या लाखो भाविकांसाठी अद्ययावत दर्शन रांग व्यवस्था, सुसज्ज वाहनतळ (पार्किंग), स्वच्छतागृहे, भक्तनिवास आणि सुरक्षेच्या अत्याधुनिक उपाययोजनांसारख्या पायाभूत सुविधा उभारणे शक्य होणार आहे. यामुळे पुण्यातील धार्मिक पर्यटनालाही मोठी चालना मिळेल.

१८९३ मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात झाली. त्यानंतर तीर्थक्षेत्राचा अ दर्जा मिळवणारे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट हे पहिलेच गणेशोत्सव मंडळ आहे. गणेश मंडळाचा कार्यकर्ता म्हणून मी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी माझ्या मागणीला पाठिंबा देत, ती पूर्ण केली. लाखो गणेश कार्यकर्त्यांच्या वतीने मी देवेंद्रजी यांचे मनापासून आभार मानतो.
– हेमंत रासने, आमदार

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×