बस सेवा सुरू झाल्याने याचा भाविकांना मोठ्या प्रमाणात फायदा
marathinews24.com
वडगाव मावळ – श्रीक्षेत्र भंडारा डोंगर ते देहूगाव या मार्गावर पीएमपीएमएलची बस सेवा सुरू झाली आहे. दिवसभरात बसच्या सात फेऱ्या होणार आहेत. जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांचे जन्मस्थान ते तपोभूमी या मार्गावर बस सेवा सुरू झाल्याने याचा भाविकांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.
‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियानाला पिंपरी चिंचवडमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद – सविस्तर बातमी
श्रीक्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्ट अध्यक्ष बाळासाहेब काशीद,ज्येष्ठ नेते माऊली दाभाडे,मावळ भाजप मावळ विधानसभा निवडणूकप्रमुख रवींद्र भेगडे, माजी उपसभापती शांताराम कदम,रामभाऊ कराळे, जगन्नाथ नाटक,जोपाशेठ पवार, मनोहर ढमाले, हभप गणेश महाराज जांभळे, शिवाजीराव पवार, नंदकुमार भसे,दिलीप ढोरे, नारायण भेगडे यांच्यासह भाविक भक्त यांच्या उपस्थितीत बससेवेचा शुभारंभ करण्यात आला.
ही सेवा केवळ एक वाहतुकीचे साधन नसून, ती अध्यात्मिक आणि धार्मिक श्रद्धेचे एकत्रीकरण करणारा पूल आहे, जो भाविकांना संत तुकाराम महाराजांच्या जवळ घेऊन जाईल असे भंडारा डोंगर ट्रस्ट अध्यक्ष साहेबराव तथा बाळासाहेब काशीद यांवेळी म्हणाले
दिवसभर या बसच्या ७ फेऱ्या सुरू राहतील ज्यामुळे भाविकांना त्यांच्या सोयीनुसार संत तुकाराम महाराजांच्या चरणी लीन होण्याचा आणि त्यांचे आशीर्वाद घेण्याचा लाभ घेता येईल. या उपक्रमाबद्दल भंडारा डोंगर ट्रस्ट समितीचे अध्यक्ष बाळासाहेब महाराज काशीद, भाजपा नेते रवींद्र भेगडे यांनी भाविकांना या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.






















