Breking News
भटके विमुक्त समाजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य; कारवाईची मागणीउपलब्ध पाणीसाठ्याचे काटेकोरपणे व्यवस्थापन करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांचे निर्देशविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम सर्व विभागांनी समन्वयाने यशस्वी करावामहाराष्ट्र गोसेवा आयोग व पशुसंवर्धन विभागातर्फे २२ जूनपासून राज्यभर ‘राज्यमाता गोमाता संवाद यात्रा’चे आयोजन – शेखर मुंदडाबीडमध्ये एफडीएची मोठी कारवाई; केजमध्ये विशाल डेअरीवर धाडरिक्षा चालकाला मारहाण करून लुटणाऱ्या टोळीला अटकदुचाकी मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक राखून ठेवण्याबाबत अर्ज स्वीकारण्यास सुरुवात‘दगडूशेठ’ गणपती यंदा गणेशोत्सवात वृंदावनमधील प्रेम मंदिरात होणार विराजमाननशामुक्त भारत अभियानाचा सामाजिक न्याय भवन येथे शुभारंभआंतरजिल्हा दरोडेखोर टोळीचा पर्दाफाश, २० गुन्हे उघडकीस

बालेवाडीत ज्येष्ठ नागरिकाची अंगठी चोरीला

बालेवाडीत ज्येष्ठ नागरिकाची अंगठी चोरीला

चोरट्यांविरुद्ध बाणेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – ज्येष्ठाकडे बतावणी करुन चोरट्याने त्यांच्याकडील ८० हजारांची सोन्याची अंगठी लांबविल्याची घटना बालेवाडी भागात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध बाणेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ज्येष्ठ नागरिकाने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुलटेकडीत व्यापाऱ्याच्या कार्यालयातून रोकड चोरी – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिक १७ सप्टेंबर रोजी दुपारी तीनच्या सुमारास बालेवाडीतील दसरा चौक परिसरातून निघाले होते. त्या वेळी चोरट्याने त्यांना अडविले. या भागात ज्येष्ठ नागरिकांकडील दागिने चोरून नेण्याच्या घटना वाढल्या आहेत. तुमच्याकडील अंगठी काढून ठेवा, अशी बतवाणी करुन चोरट्याने केली. त्यानंतर चोरट्याने त्यांना बोलण्यात गुंतविले. त्यांच्याकडील ८० हजारांची सोन्याची अंगठी काढून घेतली. अंगठी बांधून कागदात बांधून देण्याच्या बहाणा केला. ज्येष्ठाकडील अंगठी चोरून चोरटा पसार झाला. पोलीस उपनिरीक्षक संदेश माने तपास करत आहेत.

मोटार चालकाकडे बतावणी करुन मोबाइल चोरी

मोटार चालकाकडे बतावणी करुन चोरट्याने मोबाइल संच आणि कागदपत्रे चोरून नेल्याची घटना रास्ता पेठेतील पाॅवर हाऊस चौक परिसरात घडली. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका तरुणाने फिर्याद दिली आहे.

तक्रारदार तरुण नांदेड सिटी भागात राहायला आहे. गुरुवारी (१८ सप्टेंबर) दुपारी एकच्या सुमारास तो रास्ता पेठ भागात आला होता. पाॅवर चौकातील एस. व्ही. यूनियन शाळेसमोर मोटार रस्त्याच्या कडेला लावण्यात आली. तरुण मोटारीत होता. त्यावेळी दोन चोरटे तेथे आले. मोटारीच्या चाकाजवळ पैसे पडल्याची बतावणी चोरट्यांनी केली. मोटार चालक तरुण मोटारीतून उतरला. मोटारीचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून चोरट्यांनी मोटारीत ठेवलेला मोबाइल आणि महत्त्वाची कागदपत्रे चोरून नेली. सहायक फौजदार ओैचरे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×