Breking News
भटके विमुक्त समाजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य; कारवाईची मागणीउपलब्ध पाणीसाठ्याचे काटेकोरपणे व्यवस्थापन करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांचे निर्देशविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम सर्व विभागांनी समन्वयाने यशस्वी करावामहाराष्ट्र गोसेवा आयोग व पशुसंवर्धन विभागातर्फे २२ जूनपासून राज्यभर ‘राज्यमाता गोमाता संवाद यात्रा’चे आयोजन – शेखर मुंदडाबीडमध्ये एफडीएची मोठी कारवाई; केजमध्ये विशाल डेअरीवर धाडरिक्षा चालकाला मारहाण करून लुटणाऱ्या टोळीला अटकदुचाकी मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक राखून ठेवण्याबाबत अर्ज स्वीकारण्यास सुरुवात‘दगडूशेठ’ गणपती यंदा गणेशोत्सवात वृंदावनमधील प्रेम मंदिरात होणार विराजमाननशामुक्त भारत अभियानाचा सामाजिक न्याय भवन येथे शुभारंभआंतरजिल्हा दरोडेखोर टोळीचा पर्दाफाश, २० गुन्हे उघडकीस

कर्ज देण्याच्या आमिषाने तरुणाची १९ लाखांची फसवणूक

एमएनजीएल मीटर अपडेटच्या बहाण्याने जेष्ठाची साडेतीन लाखांची फसवणूक

सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा

marathinews24.com

पुणे – कर्ज देण्याच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी कात्रझ भागातील एका तरुणाची १९ लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत तरुणाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रिक्षा चालकाला मारहाण करुन लुटले – चोरटे अटकेत – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण कात्रज भागात राहायला आहे. सायबर चोरट्यांनी तरुणाला कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखविले होते. तरुणाला व्यवसायासाठी कर्ज हवे होते. तक्रारदार तरुण चोरट्यांच्या जाळ्यात सापडला. त्यानंतर तरुणाकडे चोरट्यांनी बतावणी केली. कर्ज मंजुरीसाठी काही पैसे भरावे लागतील, असे सांगून चोरट्यांनी त्याला बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले. चोरट्यांच्या खात्यात तरुणाने वेळोवेळी १९ लाख ५७ हजार रुपये जमा केले. पैसे जमा केल्यानंतर चोरट्यांनी तरुणाला कर्ज मिळवून दिले नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुलकुमार खिलारे तपास करत आहेत.

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणूक

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी सिंहगड रस्ता भागातील एका महिलेची पाच लाख ३३ हजार रुपयांची फसवणूक केली. महिलेने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला सिंहगड रस्त्यावरील नऱ्हे भागात राहायला आहे. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संदेश पाठविला. शेअर बाजाराता गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष चोरट्यांनी महिलेला दाखविले. त्यानंतर चोरट्यांनी महिलेला एका बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले. पैसे जमा केल्यानंतर चोरट्यांनी महिलेला परतावा, तसेच मूळ मुद्दलही दिली नाही. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उल्हास कदम तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×