विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – रिक्षा चालकाला मारहाण करुन त्याच्याकडील मोबाइल आणि पाच हजारांची रोकड लुटणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी अटक केली. लोहगाव भागात ही घटना घडली.
व्यवसाय करण्यावरुन झालेल्या वादातून दाम्पत्याला मारहाण – सविस्तर बातमी
प्रतिक शिवाजी असवरे (वय २०, मूळ रा. चिंचगाव, ता. माढा, जि. सोलापूर), पवन तानाजी माने (वय २०, रा. वृंदावन पार्क,लोहगाव ) यांना अटक करण्यात आली. त्यांच्याबरोबर असलेला साथीदार निखील खोबरे (वय २२, रा. पठारे वस्ती, चऱ्होली) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शुभम मारुती वाळुंज (वय २७, रा. आनंद पार्क , भैरवननगर, धानोरी) याने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाळुंज रिक्षाचालक आहे. १५ सप्टेंबर रोजी वाळुंज रात्री पावणेनऊच्या सुमारास लोहगाव भागात थांबला होता. त्याच्याबरोबर मित्र आकाश पवार होता. त्यावेळी आरोपी असवरे, माने आणि साथीदार तेथे आले. आरोपींनी वाळुंज आणि त्याचा मित्र पवार यांना बांबूने मारहाण केली. त्यांच्याकडील दोन मोबाइल संच, तसेच वाळुंज याच्याकडील पाच हजार रुपये असा मुद्देमाल लुटून आरोपी पसार झाले. पसार झालेल्या आरोपींना पोलिसांनी अटक केली. पोलीस हवालदार आदलिंग तपास करत आहेत.



















