सोन्याची तार चोरून चोरटे पसार
marathinews24.com
पुणे – सराफ व्यावसायिकांना दागिने घडवून देणाऱ्या कारागिराला चोरट्यांनी लुटल्याची घटना रविवार पेठेत घडली. कारागिरासोबत झटापट करुन ३ लाखांची सोन्याची तार चोरून चोरटे पसार झाले. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध फरासखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला. भरत देवाराम मिना (वय १८, सध्या रा. लक्ष्मी डायिंग कटींग शाॅप, रविवार पेठ) याने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, दोन चोरट्यांविरुद्ध गु्न्हा दाखल केला आहे.
हार्न वाजविल्याच्या वादातून भाऊ-बहिणीला बेदम – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवार पेठेत सराफी पेढींना दागिने घडवून देणारे व्यावसायिक आहे. मिना तेथे कारागिर म्हणून काम करतो. शनिवारी (२६ एप्रिल) सायंकाळी साडेसातच्या सुमारास तो रविवार पेठेतून सायकलवरुन निघाला होता. त्याच्याकडे ३ लाख २२ हजार रुपयांची सोन्याची बारीक तार होती. ही तार तो कारागिर कमल मंडलला देण्यासाठी निघाला होता. मोती चौक परिसरातील पावटेकर ब्रदर्स अँड सन्स या सराफी पेढीसमोर सायकलस्वार मिनाला चाेरट्यांनी अडविले. त्याच्याशी झटापट करुन चोरट्यांनी त्याच्याकडील सोन्याची बारीक तार चोरुन चोरटे पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक हाळे तपास करत आहेत.